scorecardresearch

Premium

फक्त चॅट्स करण्याव्यतिरिक्त व्हॉट्सअ‍ॅपचा करता येतो ‘या’ सहा गोष्टींसाठी वापर; तिसऱ्याचा फायदा तर…

चॅट, व्हिडीओ कॉल, व्हॉट्सअ‍ॅप कॉलिंग व्यतिरिक्त या खास गोष्टींसाठी तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपचा उपयोग करू शकता…

Apart from just chatting WhatsApp can be used for book cab metro tickets and DigiLocker
(सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम ) फक्त चॅट्स करण्याव्यतिरिक्त व्हॉट्सअ‍ॅपचा करता येतो 'या' सहा गोष्टींसाठी वापर…

व्हॉट्सअ‍ॅप हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जगभरात प्रसिद्ध आहे. पण , मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, कुटूंबातील मंडळी यांच्या बरोबर चॅट करण्या व्यतिरिक्त तुमच्या रोजच्या जीवनातील काही महत्वाच्या गोष्टींसाठी सुद्धा तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपचा वापरू शकता हे तुम्हाला माहित आहे का ? नाही, तर आज आम्ही तुम्हाला चॅट, व्हिडीओ कॉल, व्हॉट्सअ‍ॅप कॉलिंग व्यतिरिक्त अजून कोणत्या खास गोष्टींसाठी तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपचा उपयोग करू शकता हे सांगणार आहोत.

व्हॉट्सअ‍ॅपचा उपयोग आता तुम्ही सामान खरेदी करणे, कॅब बुक करणे, मेट्रो तिकीट आणि आरोग्य सेवा आदी बरंच काही गोष्टींसाठी करू शकणार आहात.

Bitcoin Halving
बिटकॉइन हॉल्व्हिंग म्हणजे काय आणि क्रिप्टोसाठी त्याचा अर्थ काय?
new FPI scam sebi
नव्या FPI फसवणुकीबाबत सेबीकडून गुंतवणूकदारांना सावधानतेचा इशारा; नेमकी फसवणूक कशी करतात?
Paytm Fastag
Paytm Fastag Deactivate कसं कराल? सहज-सोप्या पद्धती जाणून घ्या!
social media harm
तुमची मुले ऑनलाइन जगात सुरक्षित आहेत का? मुलांना ऑनलाइन जगात सुरक्षित ठेवण्यासाठी काय करता येईल? वाचा सविस्तर….

१. कॅब बूक करणे :

तुमच्या फोनमध्ये तुम्ही उबर (Uber ) अ‍ॅप इंस्टाल केलं नसेल. तर मेसेजिंग प्लॅटफॉर्मसह उबर बरोबर पार्टनरशिप करून तुम्ही सहज कॅब बुक करू शकता. तुम्ही पत्ता किंवा पिन टाईप न करता तुमचे रिअल टाईम लोकेशन उबरला पाठवू शकता.

व्हॉट्सअ‍ॅपवर तुमची उबर राइड कशी बुक करायची ?

१. तुमच्या फोनमध्ये हा ‘७२९२०००००२’ हा नंबर सेव्ह करा.
.त्यानंतर सेव्ह केलेल्या नंबरची चॅट ओपन करा आणि त्यांना हाय (Hi) असा मेसेज करा.
३. तुमचे लोकेशन आणि तुम्हाला जिथे पोहचायचे आहे ते ठिकाण त्यांना सांगा.
४. तुम्हाला प्रवासाचे भाडं आणि ड्राइव्हर किती वेळात तुमच्या लोकेशनवर पोहचेल याचा अंदाज येईल .

२. मेट्रोचे तिकीट खरेद करा :

शहरी भारतात मेट्रोतून प्रवास करणे खूप लोकप्रिय झाले आहे. पण, टोकन, तिकीट किंवा रिचार्ज कार्डसाठी तिकीट काऊंटरवर खूप रांग असते. तर तुम्ही ऑफिसममध्ये जाण्यासाठी घरातून बाहेर पडण्यापूर्वी व्हॉट्सअ‍ॅपद्वारे दिल्ली मेट्रोचे तिकीट बुक करू शकता. ही व्हॉट्सअ‍ॅप मेट्रो तिकीट सेवा गुरुग्राममधील रॅपिड मेट्रोसह दिल्ली एनसीआर (NCR) प्रदेशातील सर्व मार्गांचा समावेश करते.

व्हॉट्सअ‍ॅपद्वारे मेट्रोचे तिकीट कसे बुक कराल :

१. तुमच्या मोबाईमध्ये ९६५०८५५८०० हा नंबर सेव्ह करा.
२. त्यानंतर हाय (Hi) मेसेज करा.
३. तुम्हाला हवी ती भाषा निवडा.
. त्यानंतर तिकीट बुक करा ( Buy Ticket) वर क्लिक करा.
५. त्यानंतर मेट्रो स्टेशन निवडा.
६. आवश्यक तिकिटांची संख्या निवडा.
७. प्रवासाच्या डिटेल्स पुन्हा एकदा चेक करा आणि पैसे देण्यासाठी पुढे जा.
८. त्यानंतर क्यूआर तिकीट मिळवा आणि ते सेव्ह करा.

फक्त लक्षात ठेवा की, प्रवासी एका वेळेस फक्त ६ क्यूआर तिकीट बुक करू शकतात. तसेच हे तिकीट सर्व मेट्रो मार्गासाठी सकाळी ६ ते रात्री ९ आणि एअर पोर्ट लाइनसाठी सकाळी ४ ते रात्री ११ या वेळेस उपलबध असेल.

३. व्हॉट्सअ‍ॅपवर जिओ मार्टद्वारे किराणा माल खरेदी करा :

व्हॉट्सअ‍ॅपवर तुम्ही आता किराणा माल सुद्धा खरेदी करू शकणार आहात. जिओमार्टने व्हॉट्सअ‍ॅपसह पार्टनरशिप केली आहे. जिओ मार्ट खरेदी दरम्यान तुम्हाला ३०% टक्के सूट सुद्धा देते. (व्हॉट्सअ‍ॅपद्वारे केलेल्या सर्व ऑर्डरवर १२० रुपये सूट मिळवू शकता )

व्हॉट्सअ‍ॅपवर जिओ मार्टद्वारे किराणा माल कसे खरेदी कराल :

१. सगळ्यात पहिला जिओ मार्ट यांचा हा नंबर +९१ ७९७७०७९७७० सेव्ह करा.
२. जिओ मार्टशी संवाद साधण्यासाठी त्यांना (Hi) मेसेज करा.
३. तिथे तुम्ही खरेदी करण्यासाठी निवडक वस्तू सर्च करू शकता.
४. नंतर कार्ट मध्ये तुमच्या आवडीच्या वस्तू निवडा.
५. चेकआउट करण्यासाठी पुढे जा आणि व्हॉट्सअ‍ॅपवर युपीआयद्वारे ( WhatsApp Pay UPI) पेमेंट करा.

हेही वाचा…एअरटेलने लाँच केला दमदार प्रीपेड प्लॅन! पाहता येणार OTT प्लॅटफॉर्मवरील कंटेंट अन् मिळणार ‘इतका’ जीबी डेटा…

४. मित्र आणि कुटुंबीयांना पैसे पाठवा :

हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर आपण जे बिल येत ते मित्रांमध्ये डिव्हाईड करतो. तर आता तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपचा उपयोग मित्रांना पैसे पाठवण्यासाठी करू शकणार आहात. एकदा तुम्ही तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट्स वॉलेटशी बँक खाते लिंक केल्यानंतर, तुम्ही युपीआय (UPI) अ‍ॅप वापरणाऱ्या कोणत्याही युजरला पैसे पाठवू आणि त्यांच्याकडून घेऊ शकता – कोणतेही अतिरिक्त शुल्क न घेता.

व्हॉट्सअ‍ॅपवरून एखाद्याला पैसे कसे द्याल :

१. ज्या युजरला पैसे पाठवायचे आहेत ते चॅट उघडा.
२. त्यानंतर अटॅचमेंट या आयकॉनवर क्लिक करा.
३. पेमेंट हा पर्याय निवडा.
४. त्यानंतर तिथे रक्कम लिहा.
५. पैसे पाठवण्यासाठी तुमचा युपीआय UPI पिन व्हेरिफाय करा.

५. महत्त्वाच्या कागदपत्रांना व्हॉट्सअ‍ॅपवर करा सेव्ह :

रस्त्यावरील सुरक्षा चौकांवर आवश्यक कागदपत्रे शोधण्यासाठी तुमच्या फाइल्स आणि फोल्डर्समध्ये शोधाशोध करण्याऐवजी पॅन कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स यासारख्या महत्त्वाच्या कागदपत्रांना तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपमध्ये सेव्ह करून ठेवू शकता. अ‍ॅपवरील माईजीओवी (MyGov) हेल्पडेस्क चॅटबॉट नागरिकांना याची अनुमती देतो:

सगळ्यात पहिला डिजिलॉकर खाते तयार करा.पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स यासह डिजिटल कागदपत्रे डाउनलोड करा.ई-स्वाक्षरी केलेल्या पेन्शन स्लिप, विमा पॉलिसी पुनर्प्राप्त (Retrieve) करा.

.महत्त्वाच्या कागदपत्रांना व्हॉट्सअ‍ॅपवर करा सेव्ह :

१. माईजीओवी MyGov हेल्पडेस्क चॅटबॉटचा नंबर +९१-९०१३१५१५१५ सेव्ह करा.
२. चॅट ​​उघडा आणि “हाय” म्हणा
३. डिजिलॉकरमधील महत्वाचे डॉक्युमेंट्स उघडण्यासाठी मेनू पर्यायाला फॉलो करा.

६. ग्रामीण भागात आरोग्य सेवा :

भारताच्या ग्रामीण भागात सार्वजनिक आरोग्य सेवा अगदीच महत्वाची आहे. यावर उपाय म्हणून व्हॉट्सअ‍ॅपवर सीएससी (CSC) आरोग्य सेवा हेल्पडेस्क सुरू करण्यात आला आहे. हे शेकडो लाखो वापरकर्त्यांना टेलिहेल्थ सल्ला, सरकारी आरोग्य योजनांची माहिती, इंग्रजी आणि हिंदीमध्ये पूर्णपणे विनामूल्य ऑफर करते.

याचा लाभ कसा घ्यायचा ते पाहुयात :

. सगळ्यात पहिला मोबाईलमध्ये +९१७२९००५५५५२ हा नंबर सेव्ह करून हाय मेसेज पाठवा.
२. तुम्हाला कोणत्या सेवांची आवश्यकत्या आहे ते मेन्यूमध्ये जाऊन निवडा.
३. सूचना वाचा आणि तुमच्या आरोग्यविषयीची माहिती डॉक्टरांना द्या. या सहा महत्वाचा गोष्टींसाठी तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करू शकता.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Apart from just chatting whatsapp can be used for book cab metro tickets and digilocker asp

First published on: 27-11-2023 at 13:25 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×