scorecardresearch

अ‍ॅपल युजर्सनी त्वरित करावे ‘हे’ काम; अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान, सरकारने दिला इशारा

आयटी मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी

अ‍ॅपल युजर्सनी त्वरित करावे 'हे' काम; अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान, सरकारने दिला इशारा (Photo : Pexels)

अ‍ॅपलने आयफोन वापरकर्त्यांसाठी आयओएस १५.४ अपडेट आणण्यास सुरुवात केली आहे. हे अनेक विशेष फीचर्स आणि सुरक्षा सुविधासह येते. या व्यतिरिक्त, टेक जायंटने अ‍ॅपल वॉच, आयपॅड आणि यांसारख्या इतर उत्पादनांसाठी देखील अपडेट आणलं आहे. अद्ययावत उत्पादनामध्ये आढळलेल्या त्रुटींचे निवारण करता यावे म्हणूनच तुम्ही तुमचे अ‍ॅपल उत्पादन त्वरित अपडेट करावे असे आवाहन सरकारनेही केले आहे.

आयटी मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने अ‍ॅपल वापरकर्त्यांसाठी एक नवीन सूचना जारी केली आहे. अ‍ॅपल आयफोन, अ‍ॅपल वॉच, अ‍ॅपल टीव्ही, अ‍ॅपल आयपॅड, अ‍ॅपल मॅकबुक्स आणि काही अ‍ॅपल अ‍ॅप वापरकर्त्यांसाठी उच्च जोखमीची सूचना आहे. सुचनेनुसार, अ‍ॅपल उत्पादनांमध्ये अनेक त्रुटी नोंदवल्या गेल्या आहेत ज्यांचा उपयोग उच्च विशेषाधिकार मिळविण्यासाठी, सुरक्षा निर्बंधांना मागे टाकण्यासाठी, अनियंत्रित कोड घालण्यासाठी आणि लक्ष्य प्रणालीवर संवेदनशील माहिती उघड करण्यासाठी केला जाऊ शकतो.

नेटफ्लिक्सच्या ‘या’ फीचरमुळे जगभरातल्या युजर्सचे तब्बल १९५ वर्ष वाचतात! कंपनीनं मांडलं भन्नाट गणित!

या सूचनेमध्ये पुढे म्हटले आहे की अ‍ॅपल उत्पादनांमधील या त्रुटींमध्ये मेमरी इनिशिएलायझेशन समस्या, आउट ऑफ बाउंड रीड, आउट ऑफ बाउंड राइट, मेमरी करप्शन, नल पॉइंटर डिफरेन्स, प्रमाणीकरण समस्या, कुकी व्यवस्थापन समस्या, सिमलिंक्सच्या ऑपरेशनमध्ये परवानग्या समस्या, बफर ओव्हरफ्लो, मेमरी समस्या, प्रवेश समस्या आणि वापरकर्ता इंटरफेस समस्या यांचा समावेश आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Apple product should be updated immediately otherwise there could be huge losses the government warned pvp

ताज्या बातम्या