सध्याच्या काळात मोबाईल ही एक मोठी मुलभूत गरज बनली आहे. जर तुम्हाला मोबाईल फोन वापरायचा असेल तर तुम्हाला त्यात सिम कार्डची आवश्यकता असते. नवीन स्मार्टफोन घेण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत याचा उल्लेख अनेकदा केला जातो. पण, अनेकदा युजर्स सिम कार्ड खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. याकडे नेहमीच दुर्लक्ष करतात. म्हणून सिम कार्ड खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे, जाणून द्या.

बनावट दस्तावेजांच्या आधारे मोबाईल सिम कार्ड खरेदी करु नका. कारण तसं केल्यास आणि मोबाईल सिम कार्ड खरेदी करुन व्हॉट्सअॅप, सिग्नल, टेलिग्राम यासारखे अॅप्स वापरल्यास तुम्हाला एक वर्षांचा कारावास आणि ५० हजारांचा दंडही होऊ शकतो.

आणखी वाचा : सार्वजनिक ठिकाणी मोबाईल चार्ज करताय? वेळीच व्हा सावधान! पोलिसांनी केले आवाहन, अन्यथा…

इंडियन टेलिकम्युनिकेश विधेयक २०२२ च्या ड्राफ्टमध्ये ही गोष्ट नमूद करण्यात आली आहे. सरकार याद्वारे ऑनलाईन आयडेंडिटी फ्रॉडच्या घटनांना आळा घालण्याचा प्रयत्न करत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या विधेयकाबाबत डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशनने म्हटलं की, यामुळे टेलिकॉम सेवेचा वापर करुन फसवणूक करणाऱ्यांवर नियंत्रण मिळवण्यास मदत होईल. त्यामुळे जिथे गरज आहे तिथे ओळखीचा पुरावा सादर करणे बंधनकारक करण्यात आलं आहे. या गुन्ह्यात कडक कारवाईचे संकेत देण्यात आले आहे.