गेल्या काही महिन्यांपासून भारतासह जगभरात चॅटजीपीटीची बरीच चर्चा सुरु आहे. OpenAI ने ChatGPT या चॅटबॉटची निर्मिती केली आहे. या माध्यमातून तुम्ही विचारेलेल्या प्रश्नांची माहिती तुम्हाला अचूकपणे दिली जाते. परंतु हे चॅटजीपीटी आता डेटा लीकच्या प्रकरणामुळे चांगलेच अडचणीत सापडले आहे. या अॅपमध्ये सापडलेल्या बगमुळे अनेक युजर्सची चॅट हिस्ट्री आणि पेमेंट डिटेल्स लीक झाले आहेत. या कारणामुळे युजर्सची प्रायव्हसी धोक्यात आली आहे.

Open AI ने काही काळीसाठी चॅटजीपीटीची सेवा बंद केली होती. चॅटजीपीटीच्या ओपन सोर्स लायब्ररीमध्ये बग सापडल्यामुळे ही सेवा बंद करण्यात आली होती. ज्यात अनेक युजर्सची प्रायव्हेट डिटेल्स लीक झाल्या. याचप्रकरणी आता एक नवा खुलासा समोर आला आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या बगमुळे काही युजर्स इतर युजर्सची चॅट हिस्ट्री पाहू शकत होते.

यावर Open AI ने शुक्रवारी सांगितले की, या बगमुळे काही युजर्संना इतर युजर्सचे पेमेंट डिटेल्स देखील दिसत होते. मात्रा आता हा बग हटवण्यात आला आहे.

नेमक काय घडलं?

Open AI कंपनीने एका ब्लॉग पोस्टमध्ये सांगितले की, एका बगमुळे काही युजर्सना इतर युजर्सच्या क्रेडिट कार्डचा ४ डिजिट नंबर दिसत होता. तपासात आढळले की, बगमुळे चॅटजीपीटी प्लसच्या १.२ टक्के युजर्सच्या पेमेंट डिटेल्स इतर युजर्सना जवळपास ९ तासांपर्यंत दिसत होते. सोमवारी जेव्हा कंपनीने काही काळ चॅटजीपीटीची सेवा बंद केली, तेव्हा काही युजर्सना इतर युजर्सची डिटेल्स- जसे की, फस्ट आणि लास्ट नेम, पेमेंट अॅड्रेस, क्रेडिट कार्डचे शेवटचा ४ डिजिट नंबर, क्रेडिट कार्डची एक्सपायरी डेट दिसल्याची शक्यता आहे. पण कोणत्यही क्रेडिट कार्डचा फूल नंबर लीक झालेला नाही.

युजर्सना आपला डेटा लीक झालाय हे कसे समजणार?

Open AI च्या माहितीनुसार, डेटा लीक झालेल्या युजर्सची संख्या खूप कमी आहे. पण हा डेटा केवळ ChatGPT Plus युजर्सद्वारे एका विशिष्ट प्रोसेसद्वारेच एक्सेस करता येतो. युजर्सची सुरक्षा लक्षात घेऊन कंपनीने युजर्सना डेटा लीक झाल्याची माहिती दिली आहे. जर तुम्हालाही ChatGPT वरून डेटा लीकशी संबंधित कोणता मेल आला असेल, तर तुम्ही देखील ज्या युजर्सचा डेटा लीक झाला त्यांच्या लिस्टमधील असाल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

Open AI ने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ChatGPT हे अॅप लाँच केले. लाँच झाल्यापासून काही वेळातच या चॅटबॉटची खूप चर्चा झाली. लॉन्चिंगच्या अवघ्या ५ दिवसांत चॅटजीपीटीच्या युजर्सची संख्या १० लाखांवर पोहोचली होती. कंपनीने काही काळापूर्वी त्याचे पेड व्हर्जन लॉन्च केले आहे. यासाठी भारतात युजर्सना दरमहा 1650 रुपये खर्च करावे लागतील. कंपनी चॅटजीपीटी प्लस युजर्सना काही विशेष सेवा देत आहे.