Twitter Verification Cost Rules: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांनी ट्विटरची मालकी घेतल्यानंतर कंपनीमध्ये अनेक मोठे बदल केले. मस्क यांनी ट्विटरच्या ब्ल्यू टिक सेवेसाठी शुल्क आकारण्यात येईल अशी घोषणा केली होती. कंपनीने प्रति महिना ८ डॉलर्सचे शुल्क भरून ट्विटरवर व्हेरीफाईड अकाऊंटच्या सुविधा वापरता येतील असे सांगताच अनेकांनी या योजनेला विरोध केला होता. यानंतरही मस्क आपल्या निर्णयावर ठाम होते, मात्र नंतर या सेवेचा गैरवापर होऊन फेक अकाउंट बनू लागल्यावर ट्विटरने या निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिली होती. याच पार्शवभूमीवर आता काही सुधारित नियमांनुसार ट्विटरने तीन रंगात अकाउंट व्हेरिफिकेशनची खूण देणार असल्याचे सांगितले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ट्विटरकडून ‘ब्लू टिक’ पूर्वी राजकारणी, पत्रकार, प्रसिद्ध व्यक्तींच्या व्हेरिफाईड खात्यांना दिली जात होती. मात्र, आता सबस्क्रिप्शन सेवा सुरू केल्यानंतर ही टिक कोणालाही वापरता येणं सहज शक्य आहे, मात्र या सुविधेचा गैरवापर होऊ नये यासाठी मस्क यांनी काही पाऊले उचलली आहेत. येत्या आठवड्यात शुक्रवारी आपली व्हेरिफाईड सेवा सुरू करणार आहे. यात गोल्ड आणि ब्ल्यू या दोन नवीन सेवा देखील सुरू केल्या आहेत. यातील गोल्ड खूण ही कंपनीसाठी उपलब्ध असेल तर ज्यांना वैयक्तिक खाती व्हेरिफाय करायची आहेत त्यांना ब्ल्यू रंगाची खूण मिळणार आहे.

याशिवाय ट्विटरवर यापुढे तिसरा पर्याय म्हणजेच ट्विटर ग्रे टिक सुद्धा उपलब्ध असणार आहे. ग्रे रंगाची खूण ही सरकारी अकाउंटसाठी असेल. यात मंत्र्यांसाठी राखाडी खूण असणार की वैयक्तिक खाते असल्याने ब्ल्यू टिक असणार हे अद्याप स्पष्ट केलेले नाही. तसेच या तीन रंगांसाठी वेगवेगळ्या शुल्क रचना असणार का याबाबतही अद्याप खुलासा केलेला नाही.

ट्विटर व्हेरिफिकेशन नियम

हे ही वाचा<< विश्लेषण: ट्विटरवर बनावट खात्यांचा सुळसुळाट, एलॉन मस्कही त्रस्त; कसे ओळखायचे फेक अकाऊंट्स?

दरम्यान, सध्या ४ लाखांहून अधिक ट्विटर वापरकर्ते ब्लू टिक्स वापरतात. व्यक्ती एखाद्या संस्थेशी संबंधित असल्याची पडताळणी करून सेकेंडरी लोगो वापरू शकतात. आकडेवारी पाहिल्यास सद्य घडीला ट्विटरचे २३८ मिलियन वापरकर्ते आहेत. मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यापासून या वापरकर्त्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Elon musk announce twitter blue tick available in three colors for account verification check rules and cost svs
First published on: 26-11-2022 at 10:52 IST