अलीकडेच अॅपलने iPhone १४ सीरिजचे नवीन मॉडेल लाँच केले आहे. अॅपलने घोषणा केली आहे की यूएस मध्ये सर्व आयफोन १४ मॉडेल्समध्ये सिम-ट्रे स्लॉट नसेल. म्हणजे सर्व मॉडेल्समध्ये दोन्ही ई-सिम सपोर्ट देण्यात आला आहे. तसंच, भारतातील iPhone १४ च्या सर्व मॉडेल्सना ई-सिम तसेच फिजिकल सिम सपोर्ट मिळेल. पण तुम्हाला माहीत आहे का की ई-सिम चे देखील काही तोटे आहेत, चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जाणून घ्या e-SIM चे तोटे

घरी बसून ई-सिम बदलता येत नाही

ई-सिम बदलण्यासाठी तुम्हाला अधिकृत सेवा केंद्राला भेट द्यावी लागेल. म्हणजे जर तुम्हाला जिओ सिम घ्यायचे असेल तर तुम्हाला जिओ सर्व्हिस सेंटरला भेट द्यावी लागेल, जिथे तुम्हाला काही कागदपत्रांनंतर ई-सिम सक्रिय करावे लागेल.

( हे ही वाचा: ७९९९ किंमतीचा Realme Narzo 50i Prime भारतात लाँच; जाणून घ्या फिचर्स आणि बरंच काही..)

वारंवार फोन बदलू शकत नाही

तुम्ही वारंवार फोन बदलत राहिल्यास, ई-सिम असलेला स्मार्टफोन तुमच्यासाठी चांगला नाही. कारण प्रत्येक वेळी तुम्ही फोन बदलता तेव्हा तुम्हाला टेलिकॉम प्रोव्हायडरच्या अधिकृत केंद्रात जावे लागते, ज्यामुळे तुम्हाला समस्या निर्माण होऊ शकतात.

ई-सिम म्हणजे काय?

eSIM चा फुल फॉर्म एम्बेडेड सबस्क्राइबर आयडेंटिटी मॉड्यूल आहे. फोनमध्ये ई-सिम आधीच इनबिल्ट असते. म्हणजे ते पाहता येत नाहीत. यासाठी सिम ट्रेची आवश्यकता भासत नाही. तुमचा तपशील ई-सिममध्ये डिजिटल स्वरूपात अपलोड केला जातो. यासाठी फोनमध्ये अतिरिक्त जागेची आवश्यकता भासत नाही. अशा परिस्थितीत फोनचे वजन कमी करण्यासाठी स्मार्टफोन कंपन्यांना मदत मिळते. तसेच, ते फोनला अल्ट्रा-थिन डिझाइनमध्ये बनवण्यास मदत करते. सोप्या भाषेत सांगायचे तर ई-सिम हे अंतर्गत मेमरीसारखे आहे, ज्यामध्ये तुमचा डेटा सेव्ह केला जातो.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Esim disadvantage check these reasons otherwise you will regret buying a phone gps
First published on: 14-09-2022 at 18:40 IST