Meta Layoffs: सध्या जगभरामध्ये अनेक दिग्गज टेक कंपन्या जागतिक आर्थिक मंदी मुळे आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहे. सध्या सर्वत्रच कर्मचारी कपातीचे वारे वाहत आहे. यामध्ये Twitter, Meta आणि Apple , Amazon, Microsoft and Google parent, Alphabetआघाडीच्या कंपन्यांचा समावेश आहे. मात्र फेसबुकचची मूळ कंपनी मेटा बाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. मेटाने या आधीही कर्मचाऱ्यांची कपात केली आहे आणि पुन्हा एकदा या कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांची कपात होण्याची शक्यता आहे. पुन्हा एकदा कमर्चाऱ्यांची कपात करण्यामागे काय कारण आहे ते जाणून घेऊयात. फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हाट्सअॅप यांच्या मूळ कंपनी असलेल्या Meta मध्ये काही दिवसांत पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात होऊ शकते. मेटा प्लॅटफॉर्म पुनर्रचना आणि downsizing करण्याच्या प्रयत्नांमध्ये गुंतले आहे. यासह कंपनी नोकऱ्यांमध्ये कपात करण्याचा पुन्हा एकदा विचार करत आहे. जर असे झाले तर याचा फटका हजारो कर्मचाऱ्यांना बसू शकतो असे वॉशिंग्टन पोस्टने बुधवारी सांगितले. हेही वाचा : Tech Layoffs: ‘Meta’ मध्ये पुन्हा कमर्चाऱ्यांच्या कपातीची शक्यता, जाणून घ्या काय आहे कारण मेटा कंपनीने या आधीच आपल्या हजारो कर्मचाऱ्यांचे मूल्यमापन केले आहे. त्यांच्या कामगिरीवर त्यांना कंपनीने खराब कामगिरी असे रेटिंगसुद्धा दिले आहे. कंपनीने आपल्या ७००० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना सरासरीपेक्षा कमी रेटिंग दिले आहे. यासह कंपनीने बोनस देण्याचा पर्यायही वगळला आहे. या कारणांमुळे मेटामध्ये लवकरच मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मेटाने आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी १३ टक्के म्हणजे ११,००० कर्मचाऱ्यांना २०२२ मध्ये काढून टाकले होते. मागच्या वर्षातील कर्मचारी कपात ही मेटाच्या १८ वर्षांच्या इतिहासातील पहिले कर्मचारी कपात होती. जागतिक आर्थिक मंदीचे कारण देत अनेक दिग्गज टेक कंपन्यांनी देखील आपल्या कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांची कपात केली आहे.