दिवसेंदिवस वाढत चाललेल्या तंत्रज्ञानामुळे आता प्रत्येक कामासाठी लोक ऑनलाइन गोष्टींवर अवलंबून राहू लागले आहेत. अशा परिस्थितीत वेगवेगळ्या कामांसाठी स्वतंत्र अकाउंट्स तयार करावे लागतात. येथूनच खरी समस्या सुरू होते. वास्तविक, इतके पासवर्ड लक्षात ठेवणे शक्य नाही. अनेक वेळा लोक पासवर्ड विसरतात. बाकीच्या अ‍ॅप किंवा अकाउंटवर पासवर्ड सहज रिसेट होतो, पण जीमेलमध्ये तसे होत नाही.

गोपनीयतेमुळे आणि सुरक्षिततेमुळे, जीमेलमधील पासवर्ड पुनर्प्राप्ती प्रक्रिया खूप मजबूत आहे. अशा परिस्थितीत, अनेक वेळा लोकांना हवे असतानाही पासवर्ड रिकव्हर करता येत नाही. यामुळेच त्यांना त्यांचे ईमेल वापरता येत नाही. आज आपण अशा काही ट्रिक्स जाणून घेणार आहोत ज्याद्वारे तुम्ही ईमेल आयडी आणि फोन नंबरशिवायही तुमचे अकाउंट रिकव्हर करू शकता.

WhatsApp Web युजर्सनी ‘या’ कमांड्स नक्की लक्षात ठेवाव्या; झटपट होतील सर्व कामे

तुम्ही जीमेल अकाउंट तयार करता तेव्हा गुगल तुम्हाला रिकव्हरी ईमेल आयडी आणि फोन नंबर विचारते. अकाउंट तयार करताना दोन्ही माहिती देणे फायदेशीर आहे. याच्या मदतीने तुम्ही तुमचे अकाउंट कोणत्याही गुंतागुंतीशिवाय रिकव्हर करू शकता, परंतु जर तुम्ही चुकून ते करू शकत नसाल तर तुम्हाला थोड्या मोठ्या प्रक्रियेतून जावे लागेल.

येथे आम्ही ती प्रक्रिया सांगत आहोत ज्याद्वारे तुम्ही तुमचा जीमेलचा विसरलेला पासवर्ड बदलू शकता आणि तो पुनर्प्राप्त करू शकता. हे करण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.

आता अ‍ॅप न उघडताच होणार पेमेंट; जाणून घ्या Google Pay चे नवे फीचर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  • प्रथम जीमेल लॉगिन पेजवर जा. येथे Forget Password वर क्लिक करा.
  • तुमच्याकडे बॅकअप जीमेल आणि फोन नंबर नसल्याने तुम्हाला दुसरी पद्धत अवलंबावी लागेल. येथे तुम्हाला तुमचा शेवटचा पासवर्ड टाकण्यास सांगितले जाईल.
  • तुम्हाला मागील पासवर्ड आठवत असल्यास, तो प्रविष्ट करा.
  • जर ते लक्षात नसेल, तर तुम्हाला Try Other Way वर दोनदा क्लिक करावे लागेल.
  • यानंतर तुम्हाला I don’t have my phone number वर क्लिक करावे लागेल.
  • आता येणाऱ्या पेजवर तुम्हाला एक मेसेज दिसेल, ज्यामध्ये तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरे देण्यासंदर्भात माहिती द्यावी लागेल. आता Try Again वर क्लिक करून पुढे जा.
  • त्यानंतर काही सुरक्षा प्रश्नांची उत्तरे देऊन पुढे जा.

ही प्रक्रिया केल्यानंतर तुमचे जीमेल अकाउंट रिकव्हर केले जाऊ शकते.