Google हे एक सर्च इंजिन आहे. आपल्याला कोणत्याही विषयाची, कोणत्याही प्रकारची माहिती हवी असल्यास आपण ती गुगलवर जाऊन शोधतो. गुगल एक दिग्गज टेक कंपनी आहे. टेक जायंट असणाऱ्या गुगल कंपनीने आपल्या वापरकर्त्यांसाठी गुगल सर्च प्लॅटफॉर्मवर एक नवीन ग्रामर चेक फिचर (Google Search Grammar check feature) जोडले आहे. या फीचरचा वापरकर्त्यांना कसा फायदा होणार आहे ते जाणून घेऊयात.

गुगलने आणलेले हे ग्रामर चेक फीचर सध्या फक्त इंग्रजी भाषेकरताच मर्यादित ठेवण्यात आले आहे. येणाऱ्या काही काळामध्ये हे इतर अनेक भाषांमध्ये आणले जाऊ शकते. 9To5Google च्या एका रिपोर्टनुसार, कंपनीचे म्हणणे आहे की त्यांचे ग्रामर चेक फिचर एक वाक्प्रचार किंवा वाक्य व्याकरणाच्या दृष्टीने योग्य आहे की नाही आणि ते चूक असल्यास दुरुस्त कसे करता येईल हे पाहणार आहे.

हेही वाचा : Xiaomi चा धमाका; ‘या’ सिरीजमधील स्मार्टफोनच्या तब्बल ३ लाख युनिट्सची केली विक्री, किंमत…

रिपोर्टनुसार, हे फिचरचा वापर करण्यासाठी वापरकर्त्याला फक्त ग्रामर चेक, चेक ग्रामर किंवा ग्रामर चेकरसह एक वाक्य प्रविष्ट करणे आवश्यक आहे. जर का वाक्यामध्ये कोणतंही अडचण नसल्यास ग्रामर चेक सेक्शन किंवा कार्डमध्ये एक ग्रीन चेकमार्क दाखवला जाईल . तसे नसल्यास गुगल वाक्यात बदल करेल आणि केलेलं बदल हायलाईट करेल.या फीचरच्या मदतीने शुद्धलेखनाच्या चुकाही सुधारता येतील. नाही असे गुगलने सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जेव्हा वापरकर्ता दुरुस्त केलेल्या व्हर्जनवर जातात तेव्हा “कॉपी” बटण ऍक्टिव्ह होते. तथापि व्याकरणातील तपासण्या नेहमीच अचूक असतील असे
नाही असे गुगलने सांगितले. गुगलच्या या फीचरसाठी एक सपोर्ट पेज मागील महिन्याच्या शेवटी लाइव्ह झाले होते. मागील आठवड्यात गुगलने वापरकर्त्यांसाठी त्यांची वैयक्तिक माहिती, गोपनीयता आणि ऑनलाइन सुरक्षिततेवर नियंत्रण ठेवण्यास मदत करण्यासाठी सर्चमध्ये नवीन फीचरची घोषणा केली. ज्यामध्ये एक अशी सुविधा असेल जी वापरकर्त्यांना आपली वैयक्तिक कॉन्टॅक्ट ऑनलाईन पाहण्याची परवानगी देते.