तुम्‍ही मोबाईल रिचार्जसाठी पेटीएम, गूगल पे, फोन पे सारखे ॲप वापरता का? जर तुमचे उत्तर होय असेल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आता मोबाइल रिचार्जसाठी तुम्हाला आधीपासून जास्तीचे शुल्क द्यावे लागू शकते. Gpay नावाने प्रसिद्ध असलेले Google Pay लवकरच प्लॅटफॉर्मवर त्यांच्या मोबाइल प्रीपेड प्लॅनचे रिचार्ज करणार्‍या वापरकर्त्यांसाठी ३ रुपयांपर्यंत सुविधा शुल्क आकारण्यास सुरुवात करणार आहे.

पेटीएम, फोनपे नंतर गूगल पे देखील आकारले शुल्क?
PayTM आणि PhonePe सारखे इतर पेमेंट प्लॅटफॉर्म आधीपासूनच हे सुविधा शुल्क आकारत आहे. अशावेळी लोकांनी Google Pay ला अनेकांनी प्राधान्य दिले कारण तिथे मोबाइल रिचार्ज पेमेंट करताना अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही. पण आता Gpay द्वारे सुविधा शुल्क आकारले जात असल्याचा दावा अनेकांनी केला आहे.

एक्स(ट्विटर) वर टिपस्टर मुकुल शर्मा यांनी एक फोटो सेअर केला ज्यामध्ये त्यांच्याकडून अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्याचे सांगितले. त्यांनी Google Pay च्या नवीनतम बदलाबद्दल आणखी काही तपशील शेअर केले, ज्यानुसार, हे अॅप १०० ते २०० रुपयांच्या दरम्यानच्या मोबाइल प्लॅनसाठी सुविधा शुल्क आकारणार नाही. पण २०० रुपये, ते ३०० रुपये आणि ३०० रुपये आणि त्याहून अधिक किंमतीच्या प्रीपेड प्लॅनची निवड करणार्‍यांना अनुक्रमे रु. २ आणि रु. ३ इतके सुविधा शुल्क भरावे लागेल.

Union Budget 2024 Key Announcements in Marathi
Budget 2024 : नेहमीचीच मलमपट्टी…
turmeric for tan removal
तुमची मान काळी पडलीये का? हात-पायांवरील टॅनिंग दूर करण्यासाठी हळदीचा असा करा वापर, पाहा काय होईल कमाल!
New Or Second hand Car
New Driver Car Tips: नवीन की सेंकड हँड कार? नवीन ड्रायव्हरसाठी कोणती कार खरेदी करणे असेल योग्य?
Make Tasty Paneer Frankie for Kids at Home
मुलांसाठी घरच्या घरी अवघ्या १५ मिनिटांत बनवा टेस्टी पनीर फ्रँकी; नोट करा साहित्य आणि कृती
how to apply for ladki bahin yojana on mobile,
आता मोबाईलवरूनही करता येणार ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज; प्रक्रिया काय? जाणून घ्या…
Loksatta explained Credit card usage will become more expensive due to rule changes
विश्लेषण: ताज्या नियम बदलांमुळे क्रेडिट कार्डाचा वापर महागणार?
have you been you using toothpicks then read health experts recommendations
दातांमधील अन्नकण काढण्यासाठी टूथपिकचा वापर करणे थांबवा! तज्ज्ञांनी सुचविलेले ‘हे’ पर्याय पाहा वापरून
2-2-2 diet really beneficial for weight loss
वजन कमी करण्यासाठी ‘२-२-२ आहार पद्धत’ खरंच फायदेशीर आहे का? काय सांगतात तज्ज्ञ…

हेही वाचा – भारत सरकारने ‘एवढे’ मोबाईल नंबर केले डिस्कनेक्ट! जाणून घ्या तुमचे नंबर सुरक्षित ठेवण्याचे ‘हे’ उपाय…

असे दिसून आले की, “नवीन सुविधा शुल्क मोबाइल रिचार्जपुरते मर्यादित असल्याचे दिसते, कारण वीज बिल भरणे आणि FASTag रिचार्ज यासारख्या इतर व्यवहारांवर अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही.”

Google ने अधिकृतपणे नवीन सुविधा शुल्काची घोषणा केली नसली तरी, टेक जायंटने १० नोव्हेंबर रोजी Google Pay साठी सेवा अटी अपडेट केल्या होत्या, ज्याने कदाचित ‘Google Fees’ नावाचा नवीन टर्म सादर केला असावा ज्याने असे सुचवले आहे की, कंपनी मोबाइलसाठी अतिरिक्त शुल्क आकारणे सुरू करू शकते.

हेही वाचा – मानव नसूनही मॉडेलिंग करते ‘ही’ इन्फ्ल्यूएंसर! महिन्याला नऊ लाख कमवणारी ही मॉडेल आहे तरी कोण पाहा…

लोकप्रिय पेमेंट ॲप हे Google Pay आहे
पेमेंट ॲप गूगल पे के ६० मिलियनपेक्षा जास्त वापरतात. त्याचबरोबर Google pay भारतीयांसाठी दुसरs लोकप्रिय पेमेंट अॅप आहे. गूगल पे वर ग्राहकांना क्यू आर कोड स्कॅन, कॉन्टॅक्ट पे, फोन नंबर, बँक ट्रान्सफर, यूपीआई आयडी, सेल्फ ट्रान्सफर, बिल्स आणि मोबाइल रिचार्ज सुविधा मिळते. या सर्व ट्रँजेक्शनसाठी अद्याप Google वर कोणतेही शुल्क आकारले जात नव्हते पण येत्या काही दिवसांत रिचार्ज प्लॅनवर सुविधा शुल्क आकारले जाऊ शकते.

सुविधा शुल्क न भरता तुम्ही रिचार्ज कसे करू शकतात?
जर तुम्हाला मोबाइल रिर्जसाठी सुविधा शुल्क भरायचे नसेल तर जे कंपनीचे सीम कार्ड वापरता त्यांच्या अधिकृत अॅपवर जाऊन तुम्ही रिचार्ज करू शकता जिथे कोणतेही सुविधा शुल्क आकरले जाणार नाही. माय जिओ अॅप आणि एअरटेल, व्हीआय ग्राहकांना एअरटेल या कंपन्याच्या अधिकृत अॅप वापरून सुविधा शु्लक न भरता मोबाइल रिचार्ज करू शकता. ही ट्रिक इंस्टाग्रामवर techy_marathi या अकांउटवर शेअर केली आहे. एकदा नक्की वापरून पाहा,