सध्या सगळीकडे UPI पेमेंट करण्याचे प्रमाण वाढत आहे. मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक डिजिटल पेमेंटचा वापर करताना दिसून येत आहेत. यासाठी वापरकर्ते Google Pay, Phone Pay, Paytm आणि इतर अन्य Apps वरून डिजिटल पेमेंट करतात. आता ‘गुगल पे’ ने UPI अकाउंट अ‍ॅक्टिव्ह किंवा तयार करण्याची प्रक्रिया सोपी केली आहे. आता वापरकर्ते त्यांचे अकाउंट सेटअप करण्यासाठी आधार कार्डचा वापर करू शकणार आहेत. त्यामुळे एखाद्याला डेबिट कार्डासह पिन सेट करण्याची आवश्यकता नाही.

”UPI करोडो भारतीय वापरकर्त्यांपर्यंत पोहोचत आहे. या फीचरमुळे अनेक वापरकर्त्यांना युपीआय आयडी सेट करण्यास मदत होणार आहे. व ते डिजिटल पेमेंट करण्यासाठी सक्षम होतील. आधार कार्डने अकाउंट सेटअप करता येणार असून, हे आता सपोर्टेड बँकेत अकाउंट असणाऱ्यांसाठी उपलब्ध असणार आहे.” असे Google ने सांगितले. याबाबतचे वृत्त इंडिया टूडेने दिले आहे.

After Instagram WhatsApp Facebook Now Twitter X also aims to add AI on its platform through its new feature Stories
इन्स्टाग्राम राहिले बाजूला आता X वरही होणार स्टोरी शेअर; कसे काम करणार ‘हे’ फीचर? जाणून घ्या
WhatsApp Soon Allow Users To update With privately mention contacts in status updates maintaining user privacy
व्हॉट्सॲपच्या स्टेटसमध्ये इन्स्टाग्राम फीचर; फोटो, व्हिडीओ टाकताना मिळणार ‘ही’ खास सोय; ‘असा’ करा वापर
Efforts continue to rescue a six-year-old boy who fell into a borewell in Madhya Pradesh'
VIDEO : ४० फूट खोल बोअरवेलमध्ये अडकला चिमुकला, १२ तासांपासून आपत्कालीन प्रतिसाद दलाकडून शर्थीचे प्रयत्न
cholesterol levels
‘हा’ एक ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल झपाट्याने होईल कमी; फक्त सेवनाची पद्धत एकदा डाॅक्टरांकडून जाणून घ्या

हेही वाचा : तब्बल २० लाखांपेक्षा अधिक कुटुंबांना मिळणार मोफत इंटरनेट सेवा; भारतातील ‘या’ राज्याने केली मोठी घोषणा

गुगल हे आधारवर आधारित सेवा का देत आहे ? यावर टेक जायंटने आपले उत्तर दिले आहे. कंपनी म्हणते भारतातील ९९.९ टक्के प्रौढ लोकसंख्येकडे आधार क्रमांक आहे. तसेच याचा वापर ते महिन्यातून किमान एकदा तरी करतात. यासाठी युपीआयवर ‘आधार’ आधारित ऑनबोर्डिंग सुविधा अनेक वापरकर्त्यांना आणि पुढील आर्थिक गोष्टींसाठी दिली जात आहे.

जे वापरकर्ते नवीन फीचरच्या माध्यमातून युपीआय सेटअप करू इच्छितात त्यांना त्यांच्या आधार आणि बँक अकाउंटमधील फोन नंबर एकच असल्याची खात्री करावी लागेल. तसेच बँक अकाउंट आणि आधार लिंक असणे आवश्यक आहे. या सर्व गोष्टी असतील तर तुम्ही नवीन फीचरचा वापर करून Google Pay UPI अकाउंट अ‍ॅक्टिव्ह करू शकाल.

हेही वाचा : Google ने रोलआऊट केले ‘हे’ फिचर; आता फिंगरप्रिंट, फेसअनलॉकच्या मदतीने करता येणार साइन इन, जाणून घ्या

आधार कार्ड वापरून Google Pay अकाऊंट कसे अ‍ॅक्टिव्ह करावे ?

१. सर्वात पहिल्यांदा तुमच्या फोनमध्ये गुगल प्ले App डाउनलोड करा.

२. त्यानंतर तुम्ही जेव्हा ते सुरू कराल आणि सेटअप स्क्रीनवर जाल , तिथे तुम्हाला डेबिट कार्ड किंवा आधार आधारित युपीआय ऑनबोर्डिंग असे पर्याय दिसतील.

३. त्यामधील आधार हा पर्याय निवडावा.

४. पुढील प्रोसेस सुरू करण्यासाठी आपल्या आधार क्रमांकाचे पहिले सहा आकडे प्रविष्ट करावेत.

५. Authentication पूर्ण करण्यासाठी वापरकर्त्यांना UIDAI आणि त्यांच्या बँकेकडून प्राप्त झालेला OTP नंबर टाकावा लागेल.

६. वरील संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर तुमची संबंधित बँक प्रक्रिया पूर्ण करेल. त्यानंतर वापरकर्ते त्यांचा UPI पिन सेट करू शकणार आहेत.

Google Pay वर आधार क्रमांक जोडणे सुरक्षित आहे का?

वरील सर्व स्टेप्स पूर्ण केल्यानंतर ग्राहक व्यवहार करण्यासाठी किंवा शिल्लक बॅलन्स चेक करण्यासाठी गुगल प्लेचा वापर करू शकणार आहेत. वापरकर्त्याने त्याच्या आधार क्रमांकाचे पहिले सहा आकडे प्रविष्ट केले की ते validation साठी NPCI मार्फत UIDAI कडे पाठवले जाते. ही प्रक्रिया वापरकर्त्यांच्या आधार नंबरची सुरक्षितता सुनिश्चित करते.