ChatGpt : सध्याच्या काळात ChatGpt हे सध्या खूप चर्चेत असलेला विषय आहे. हे माध्यम असे आहे की तुम्ही जे त्याला विचाराल त्याचे त्याच्याकडे असलेल्या माहितीरून तो आपल्याला उत्तर देईल. सध्या ते इंग्रजी भाषेवर काम करते. हे भविष्यात इतर भाषांमध्ये जोडले जाऊ शकते. यामुळे तुम्हाला कमीत कमी वेळा तुम्हाला हवी असलेली माहिती मिळते. आणि ते शोधण्यासाठी तुम्हाला दुसरीकडे जावे लागत नाही. ChatGPT हे टूल OpenAI ने विकसित केले आहे. आता हेच चॅटजीपीटी टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात हे माध्यम गेमचेंजर ठरणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या माध्यमामध्ये माणसांप्रमाणेच बोलण्याची आणि विचार करण्याची क्षमता आहे. हा एक प्रकारचा चॅटबॉट आहे. यात प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळते. चॅटबॉट प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यास सक्षम असतो यात काही नवीन गोष्ट नाही. पूर्वीपासून अनेक प्रकारचे चॅटबॉट्स सुरु असले तरी चॅटजिपीटी मध्ये काहीतरी वेगळेपण आहे ते आपण जाणून घेऊयात.

हेही वाचा : Airtel Recharge Plan: एअरटेलने आणला सर्वात स्वस्त प्लॅन; ३५ रुपयांत मिळणार ‘इतका’ जीबी डेटा

तुम्ही करत असलेले वर्कआऊट असेल किंवा डाएट प्लॅन असेल हे सांगण्यासाठी हे माध्यम मदत करते. chatgpt मुळे आयफोन, गुगल सर्च आणि अ‍ॅमेझॉन अ‍ॅलेक्सा वर काही परिणाम होणार का हा मोठा प्रश्न आहे. chatgpt हे चॅटबॉट अॅलेक्सा किंवा सिरी सारख्या व्हर्च्युअल असिस्टंट्स, सर्च इंजिन्स आणि तुमचा ईमेल इनबॉक्स सोबत काम करण्याची पद्धत बदलू शकते.

हेही वाचा : मायक्रोब्लॉगिंग साईट Twitterवर आणणार स्वतःची नाणी?; जाणून घ्या अहवाल

पुढील सहा महिन्यात आम्ही चॅटबॉट्स आणि व्हॉइस असिस्टंटच्या क्षमतांमध्ये मोठे पाऊल टाकणार असल्याचे अ‍ॅलन इन्स्टिट्यूट फॉर आर्टिफिशियल इंटेलिजेंसचे सल्लागार आणि बोर्ड सदस्य ओरेन इत्झिओनी यांनी सिनेटला सांगितले आहे. वेगाने काम करून ChatGpt ची नवीन व्यावसायिक सिरीज लवकरच येणार असल्याचे OpenAi चे अध्यक्ष आणि सहसंस्थापक ग्रेग ब्रॉकमन यांनी आपल्या १० जानेवारीच्या ट्विटमध्ये सांगितले.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Greg brockman president of openai said commercial series of chatgpt will be launched soon tmb 01
First published on: 14-01-2023 at 11:30 IST