Holi Smartphone Safety Tips:  होळीचा सण अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपला आहे. सणाला अवघे काही दिवस उरले आहेत. जर या दिवशी पाण्याने रंग खेळले नाहीत तर होळीची मजा नाहीशी होते, परंतु अनेकदा मजा करताना आपण आपल्या फोनचे खूप नुकसान करतो. अशा होळीत रंग खेळताना आपल्या स्मार्टफोनची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. रंग खेळताना स्मार्टफोनवर गुलाल किंवा पाणी पडले तर ते खराब होऊ शकते. होळीच्या दिवशी एन्जॉय करताना स्मार्टफोन खराब होऊ नये म्हणून, फोनची विशेष काळजी घेतली पाहिजे. चला तर बघुयात फोन खराब न होण्यासाठी काही खास टिप्स…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाणी आणि रंगाने स्मार्टफोन खराब होऊ नये म्हणून ‘या’ टिप्सचा वापर करा

१. वॉटर प्रूफ कव्हर वापरा

लोक होळी खेळतांना फोटो काढणार नाही, असे होणे शक्य होणार नाही. अशावेळी पाणी व रंग उधळतांना फोन खराब होऊ नये म्हणून तुम्ही चांगल्या दर्जाचे वॉटरप्रूफ कव्हर वापरावे. वॉटरप्रूफ कव्हर घेताना, तुम्ही हे लक्षात ठेवावे की झिप कव्हर कधीही घेऊ नका कारण पाणी सहजपणे झिपच्या आत जाते ज्यामुळे तुमचा फोन खराब होऊ शकतो.

(हे ही वाचा : पुन्हा मिळणार नाही संधी! एकही पैसा खर्च न करता घरी न्या दोन जबरदस्त 5G स्मार्टफोन, फक्त ‘येथे’ मिळत आहे ऑफर )

२. वॉटरप्रूफ कव्हर 

जर तुम्ही तुमच्या स्मार्टफोनसोबत होळी खेळण्याचा विचार करत असाल तर तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर ग्लास बॅक कव्हर लावा. याचा वापर करून तुम्ही तुमचा स्मार्टफोन पाण्यापासून तसेच रंगांपासून वाचवू शकता. तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही पर्यायांमधून ग्लास बॅक कव्हर खरेदी करू शकता.

३. पॉलिथिनचा वापर

जर तुमच्याकडे चांगल्या दर्जाचे स्मार्टफोन कव्हर नसेल, तर तुम्ही तुमचा फोन पॉलिथिनमध्येही कव्हर करू शकता. फोनचे दोन-तीन थर पॉलिथिनमध्ये गुंडाळून तुम्ही फोन सुरक्षित करू शकता.

४. ग्लब्स वापरा

फोनला रंगापासून वाचवण्यासाठी तुम्ही ग्लब्स देखील वापरू शकता. हातमोजे घातल्याने तुमच्या हातावर डाग पडणार नाहीत आणि तुम्ही कोणत्याही भीतीशिवाय तुमचा फोन वापरू शकाल.

(हे ही वाचा : धमाकेदार ऑफर! होळीच्या मुहूर्तावर Jiomart सेलमध्ये ‘या’ टाॅप ५ स्मार्टफोन्सवर मिळतेय बंपर सूट, होणार पैशांची बचत )

५. तुमच्या फोनचे स्पीकर बंद करा

पाण्यामुळे तुमच्या स्मार्टफोनचे स्पीकर खराब होऊ शकतात. हे टाळण्यासाठी तुम्ही टेप लावून स्पीकर्स बंद करू शकता. तुम्ही चार्जिंग पोर्टवर टेप देखील लावू शकता.

६. फिंगरप्रिंटऐवजी पॅटर्न लॉक लावा

जर तुम्ही फोन पॉली बॅगमध्ये ठेवला तर तुम्हाला तो उघडण्यासाठी स्मार्टफोन बाहेर काढावा लागेल. हे टाळण्यासाठी, तुम्ही पॅटर्न लॉकचा वापर करावा, जेणेकरून तुम्ही पॉली बॅगमधून फोन अनलॉक करू शकाल.

७. शक्यतो फोन बंद ठेवा

होळी खेळताना तुम्ही तुमचा फोन बंद ठेवले तर अधिक चांगले होईल. मोबाईल जर पाण्यात भिजला असेल, तर लगेच स्वीच ऑफ करा. ओला झालेला मोबाईल वापरणे धोकादायक ठरु शकते. यासह जर आपण स्क्रीन गार्डचा वापर करत असाल तर, ते देखील काढून टाकणे अधिक चांगले होईल.

८. पाणी गेल्यास चार्जिंग करणे टाळा

धुलीवंदनाला जर तुमच्या स्मार्टफोन अथवा अन्य गॅजेट्समध्ये पाणी गेले असल्यास त्वरित चार्जिंगला लावण्याची चूक करू नका. असे केल्याने फोन पूर्णपणे खराब होण्याची शक्यता आहे. तसेच, इलेक्ट्रिक शॉकचा देखील धोका असतो. त्यामुळे मोठे नुकसान टाळण्यासाठी धुलिवंदनाला फोनची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

अशाप्रकारे यंदाच्या होळीला तुम्ही तुमच्या स्मार्टफोनची सुरक्षा करु शकता.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Holi 2023 keep your smartphone safe with these tips and tricks pdb
First published on: 04-03-2023 at 17:18 IST