How to get refund if recharged on wrong Number: एक काळ होता जेव्हा मोबाईल फोनवर रिचार्ज करण्यासाठी दुकानात जाऊ टॉप अप कार्ड खरेदी केले जात असते. त्यावेळी इंटरनेट खूप महाग होते आणि दुकानदार सुज्ञपणे रिचार्ज करत असे. पण जस जसा काळ बदलला तस तसे नवीन तंत्रज्ञान बाजारात आले आणि आता घरबसल्या रिचार्ज करणे शक्य झाले आहे. तुम्ही रिचार्ज करण्यासाठी वेगवेगळे अॅप्स वापरत असाल. कित्येकवेळा घाईगडबडीत आपण चुकीचा रिचार्ज करतो. जर असा रिजार्च कमी किंमतीचा असेल तर आपण त्याकडे फारसे लक्ष देत नाही पण जर जास्त किंमतीचा रिचार्ज चुकीच्या नंबरवर गेला तर? अशा वेळी तुमचे नुकसान झाल्यामुळे तुम्हाला फार वाईट वाटते आणि तुम्ही स्वत:ला दोष देत बसकता. पण बहूतेक लोकांना अजूनही हे माहित नाही की चुकीच्या नंबरवर रिचार्ज केला तरी तुम्हाला तुमचे पैसे परत मिळू शकतात. कदाचित तुम्हालाही याबाबत माहित नसेल. काळजी करू नका आज आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देणार आहोत.

हेही वाचा – तुमच्याही हेल्मेटचा वास येतोय का? ‘या’ ५ टीप्स वापरुन दुर्गंधी कायमची दूर करा

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
balmaifal article, story for kids, water literacy, Water importance, do not waste water lesson, story cum lesson for water, save water, kids and water, marathi article, loksatta article,
बालमैफल : जलसाक्षरता
lancet study on breast cancer how early diagnosis and understanding relapse can help women
भारतात दर चार मिनिटांनी एका महिलेला स्तनाच्या कर्करोगाचे निदान; महिलांकडे दुर्लक्ष होतंय का? वाचा तज्ज्ञांचं निरीक्षण
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?

जर चुकीच्या नंबरवर रिचार्ज गेल्यास असे मिळवा पैसे परत
जर तुम्ही आपल्या चुकून किंवा घाईगडबडीत चुकीच्या नंबरवर रिचार्जवर केल्यास ताबडतोब टेलीकॉम ऑपरेटरच्या कस्टमर केअर नंबलवर कॉल करून सर्व माहिती देऊ शकता. म्हणजेच रिचार्ज किती किंमतीचा होता, कोणत्या कंपनीच्या नंबरवर रिचार्ज केला झाला आहे, कोणत्या अॅपवरून रिचार्ज केला इ. माहिती द्यावे लागते. त्याशिवाय तुम्हाला संबधीत कंपनीच्या इमेलवर सर्व माहिती पाठवू शकता जेणेकरून तुम्ही तुमचे पैसे परत मिळवू शकतील. भारतात बहूतेक लोक व्ही-आय, जियो आणि एअरटेलचे सीमकार्ड वापरतात. या कंपन्यांचे इमेल आयडी खाली दिले आहेत.

VI- customercare@vodafoneidea.com
Airtel- airtelpresence@in.airtel.com
JIO- care@jio.com

जेव्हा तुम्ही सर्व तपशील पाठवता, तेव्हा कंपनी ते त्यांच्या बँकएन्डमध्ये माहिती तपासते आणि सर्व माहिती बरोबर असल्यास तुमचे पैसे परत केले जाऊ शकतात. लक्षात घ्या, तुम्ही जितक्या लवकर हे काम कराल तितके तुमचे पैसे परत मिळण्याची शक्यता जास्त आहे.

हेही वाचा – नवरदेव होऊन घोड्यावर बसला एलॉन मस्क? शेरवानी लूक होतोय व्हायरल, पाहा फोटो

टेलिकॉम कंपनी ऐकत नसेल तर हे करा
अनेक वेळा असे देखील दिसून येते की टेलिकॉम कंपन्या ग्राहकांच्या तक्रारी ऐकून घेत नाहीत आणि त्यावर दीर्घकाळ कोणतेही काम केले जात नाही. तुमच्या तक्रारीवरही दूरसंचार कंपनीने कोणतीही कारवाई केली नाही, तर तुम्ही ग्राहक सेवा पोर्टलवर तुमची तक्रार नोंदवू शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही व्हॉट्सअॅपद्वारेही तुमची तक्रार नोंदवू शकता. याशिवाय तुम्ही प्ले स्टोअरवरून कस्टमर सर्व्हिस पोर्टलचे अॅप डाउनलोड करून तक्रार दाखल करू शकता.

लक्षात ठेवा, तक्रार वेळेवर केली तरच पैसे परत मिळतील आणि ज्या नंबरवर रिचार्ज केले आहे त्या नंबरशी तुमचा मोबाइल नंबर जोडलेला असणेही आवश्यक आहे. म्हणजेच एक किंवा दोन नंबरमुळे रिचार्ज चुकीच्या नंबरवर गेला असेल तर अशा परिस्थितीत पैसे परत मिळण्याची शक्यता जास्त असते. जर संपूर्ण आकडा वेगळा असेल, तर अशा परिस्थितीत कंपनी पैसे देण्यास टाळाटाळ करते कारण बरेच लोक कंपनीला जाणीवपूर्वक त्रास देतात.