Send Money Using WhatsApp : यूपीआयद्वारे डिजिटल पेमेंट करता येत असल्याने जवळ जास्त कॅश बाळगण्याची गरज पडत नाही. तसेच, दुकानांमध्ये गुगल पे, फोन पे, पेटीएम सारखे यूपीआय पेमेंट अ‍ॅप उपलब्ध असल्याने पैसे नसल्यास ऑलनाइन पेमेंटद्वारे पेमेंट करता येऊ शकते. यामुळे रोखची चणचण असलेल्यांसाठी ऑनलाइन पेमेंट सुविधा सोयिस्कर ठरत आहे. परंतु, लो सर्व्हर किंवा इतर तांत्रिक अडचणींमुळे कधीकधी यूपीआय अ‍ॅप्समधून ऑनलाईन पेमेंट होत नाही. अशात व्हॉट्सअ‍ॅपद्वारे तुम्ही पेमेंट करू शकता.

व्हॉट्सअ‍ॅपद्वारे तुम्ही सहजरित्या कोणालाही पैसे पाठवू शकता. काही महिन्यांपूर्वीच हे फीचर लाँच झाले आहे. मोबाईल क्रमांकावर किंवा क्यूआर कोड स्कॅन करून तुम्ही पैसे पाठवू शकता. मात्र, यासाठी तुम्हाला आधी व्हॉट्सअप बँकेशी जोडावे लागेल. यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा.

(आणखी वाचा – ‘या’ 5 भन्नाट ट्रिक्स लक्षात ठेवा, Whatsapp वापरताना भरपूर कामी येतील)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१) व्हॉट्सअ‍ॅप बँक खात्याशी जोडा

  • अँड्रॉइड किंवा आयओएसवर व्हॉट्सअ‍ॅप सुरू करा.
  • ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहे त्याचे चॅट उघडा. अ‍ॅपच्या वरच्या भागात उजव्या बाजूला असलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करून तुम्ही थेट पेमेंट पर्याय उघडू शकता.
  • आता अ‍ॅड युअर पेमेंट मेथडवर टॅप करा आणि नंतर अ‍ॅड बँक अकाउंटवर क्लिक करा.
  • ज्या बँकेत तुमचे सेव्हिंग खाते आहे ती निवडा.
  • आता तुम्हाला फोन नंबर व्हेरिफाय करावा लागेल. फोनमध्ये तुमचा नोंदणीकृत क्रमांक असायला हवा. नोंदणीकृत क्रमांक आणि व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक एकच असेल तर व्हॉट्सअ‍ॅप तो क्रमांक आपोआप व्हेरिफाय करेल.
  • आता बँक खात्याची माहिती टाका.
  • नोंदणीकृत खात्यावरून पैसे पाठवणे आणि मिळवण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपला परवानगी द्या.
  • कंटिन्यूवर टॅप करा. आता तुमची बँक व्हॉट्सअ‍ॅपशी जोडलेली आहे.

(आणखी वाचा – Laptop घेण्यासाठी घाई करू नका, ‘या’ गोष्टी तपासून खरेदी करा, फायद्यात राहाल)

२) व्हॉट्सअ‍ॅपवरून असे करा पेमेंट

  • ज्या क्रमांकावर पैसे पाठवायचे आहे त्याचे चॅट उघडा किंवा थ्री डॉटमधून थेट पेमेंट पर्याय उघडा.
  • क्रमांक किंवा क्यूआर कोडद्वारे पेमेंट निवडा.
  • आता जी रक्कम पाठवायची आहे ती टाका.
  • आता नोंदणीकृत बँकेसाठी सेट केलेला यूपीआय पीन टाका आणि सेंट पेमेंटवर टॅप करा.