Reliance Jio 90 Days Validity Plan : अमर्यादित कॉलिग आणि दीर्घकाळ डेटा देणारा एक प्लान रिलायन्स जिओकडे उपलब्ध असून या प्लानमुळे एकदा रिचार्ज केल्यावर दर महिन्याला रिचार्ज करण्याची गरज पडत नाही. तुम्ही अमर्यादित कॉलिंग आणि इंटरनेटचा लाभ घेऊ शकता. कोणता आहे हा प्लान आणि त्यात कोणते बेनेफिट्स मिळतात? जाणून घेऊया.

मासिक रिचार्ज करून कंटाळलेल्या लोकांसाठी रिलायन्स जिओकडे ७४९ रुपयांचा जिओ प्रिपेड प्लान उपलब्ध आहे. या प्लानची व्हॅलिडिटी जवळपास तीन महिन्यांची आहे. ९० दिवसांची व्हॅलिडिटी असलेल्या या प्लानमध्ये एकूण १८० जीबीचा डेटा २ जीबी दैनिक डेटा मर्यादेसह वापरता येतो. त्यानंतरही डेटा वापरता येतो, मात्र स्पीड घटून ६४ केबीपीएस इतकी मिळते. या प्लानमध्ये तुम्हाला अमर्यादित कॉलिंग, रोज १०० एसएमएस आणि जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ क्लाऊड आणि जिओ सिक्युरिटी हे जिओ अ‍ॅप्स वापरता येतात.

tax harvesting in marathi
Money Mantra: टॅक्स हार्वेस्टिंग म्हणजे काय? त्याचा वापर कसा कराल? केव्हा टाळाल?
cholesterol levels
‘हा’ एक ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल झपाट्याने होईल कमी; फक्त सेवनाची पद्धत एकदा डाॅक्टरांकडून जाणून घ्या
Perfect 7 Times To Drink Water In 24 Hours
दिवसभरात पाणी पिण्यासाठी ‘या’ ७ वेळा आहेत परफेक्ट! २४ तासांत कधी पाणी प्यावं? वाचा फायदे
IPL Star RCB Cameron Green 60 Percent Working Kidney Tells diet to control
६० टक्के कार्यरत किडनीसह IPL खेळतोय RCB चा ‘हा’ स्टार खेळाडू; किडनीच्या सुदृढतेसाठी काय खावं, काय नाही?

(Laptop घेण्यासाठी घाई करू नका, ‘या’ गोष्टी तपासून खरेदी करा, फायद्यात राहाल)

जिओकडे ८४ दिवसांचा प्लान देखील उपलब्ध आहे. या प्लानची किंमत ७१९ रुपये असून त्यात एकूण १६८ जीबी डेटा, अमर्यादित कॉलिंग, रोज १०० एसएमएस आणि जिओ अ‍ॅपचे लाभ मिळतात. हा प्लान जिओ वेल्कम प्लान अंतर्गत येतो. एअरटेलकडेही ८४ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह ७१९ रुपयांचा प्लान उपलब्ध आहे. या प्लान अंतर्गत युजरला रोज १.५ जीबी डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि १०० एसएमएस मिळतात. प्लानमध्ये एक्सट्रिम अ‍ॅप बेनेफिट देखील मिळते.