व्हॉटसअ‍ॅप हे सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप आहे. आपण दिवसभरात कितीही व्यस्त असलो तरी व्हॉटसअ‍ॅपच्या माध्यमातून सर्वांशी संपर्कात असतो. व्हॉटसअ‍ॅपवरून मेसेज करणे, फाइल्स पाठवणे, कॉल – व्हिडीओ कॉल करणे अशा अनेक गोष्टी सहजरित्या करता येतात. त्यामुळे अनेकजण व्हॉटसअ‍ॅपवरून संवाद साधण्याला प्राधान्य देतात. व्हॉटसअ‍ॅपकडुनही युजर्सना आकर्षित करण्यासाठी सतत नवे फीचर्स लाँच केले जातात. यातील काही फीचर्सची युजर्सना कल्पना देखील नसते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कामानिमित्त किंवा जवळच्या व्यक्तींशी संपर्कात राहण्यासाठी सतत वापरल्या जाणाऱ्या या अ‍ॅपचे दोन पर्याय उपलब्ध असावे, म्हणजेच दोन व्हॉटसअ‍ॅप अकाउंट उपलब्ध असावे असे वाटते. यामुळे वैयक्तिक चॅट आणि कामाचे ऑफिशिअल चॅट हे वेगळे ठेवण्यास मदत मिळू शकते. काही सोप्या स्टेप्स वापरून तुम्ही हे करू शकता. कोणत्या आहेत या स्टेप्स जाणून घ्या.

आणखी वाचा : आता WhatsApp वर ऑनलाईन आहात ते कोणालाही समजणार नाही; फक्त बदला ही सेटिंग

एकाच फोनमध्ये २ व्हॉटसअ‍ॅप अकाउंट उघडण्यासाठी वापरा या स्टेप्स

  • तुमच्या अँड्रॉइड डिवाईसचे सेटिंग्स उघडा. त्यामध्ये अ‍ॅप्स पर्याय शोधा.
  • अ‍ॅप्स पर्यायामधील ड्युअल अ‍ॅप्स > क्रिएट या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर ड्युअल अ‍ॅप्स सपोर्टेड अ‍ॅप्समध्ये व्हॉटसअ‍ॅपची निवड करा.
  • यानंतर युजर्सना ड्युअल अ‍ॅप्स टॉगल करावे लागेल. अ‍ॅप लाँचरमध्ये दुसरे व्हॉटसअ‍ॅप अकाउंट सेट करा.
  • दुसरे व्हॉटसअ‍ॅप अकाउंट सेट करण्यासाठी दुसऱ्या फोन नंबरची गरज भासेल.
  • अशाप्रकारे या स्टेप्स वापरुन दुसरे हॉटसअ‍ॅप अकाउंट उघडता येईल. ही सुविधा सध्या शाओमी डिवायसेसमध्ये उपलब्ध आहे.
मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to use two whatsapp account in one mobile know simple steps pns
First published on: 27-10-2022 at 18:35 IST