अलिकडे व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजरसाठी अनेक जबरदस्त फीचर्स लाँच करत आहेत. व्हॉट्सअ‍ॅपने एकापेक्षा अधिक फोनवर एकच खाते उघडण्याचे फीचर उपलब्ध करून दिले आहे. तसेच, ग्रुपमध्ये सुद्धा १ हजारपेक्षा अधिक सदस्यांचा समावेश करण्याची सोय केली आहे. यासह व्हॉट्सअ‍ॅपने युजर्सना पोल तयार करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. आता युजर व्हॉट्सअ‍ॅपवर पोल तयार करू शकतात.

पोलचा पर्याय व्हॉट्सअ‍ॅप वेबवर दिसला नाही, मात्र ते लवकरच उपलब्ध होऊ शकते. पोल वैयक्तिक आणि ग्रुप चॅटवर उपलब्ध आहे. युजर एका पोलमध्ये १२ किंवा त्यापेक्षा कमी पर्याय टाकू शकतात. बारापेक्षा अधिक पर्याय दिल्यास व्हॉट्सअ‍ॅप याबाबत तुम्हाला इशारा देईल.

(एकापेक्षा अधिक स्मार्टफोनवर चालवता येईल एकच व्हॉट्सअ‍ॅप खाते, जाणून घ्या कसे)

असे बनवा पोल

पोल फीचर वापरण्यासाठी तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप अपडेट करणे गरजेचे आहे. अपडेट केल्यानंतर अ‍ॅप उघडा आणि वैयक्तिक किंवा ग्रुप चॅट उघडा.

  • आयओएसमध्ये जेथे तुम्ही टाईप करता त्या चॅट बॉक्सच्या शेजारी असलेल्या प्लस चिन्हावर टॅप करा.
  • अँड्रॉइडमध्ये चॅट बॉक्सचा भाग असलेल्या पेपरक्लिप चिन्हावर टॅप करा. दोन्ही प्रक्रियेत तुम्हाला मेन्यू उघडल्याचे दिसेल.
  • यादीत शेवटी तुम्हाला पोल हा पर्याय दिसून येईल. पोल या पर्यायावर टॅप करताच नवा मेन्यू ओपन होईल.
  • व्हॉट्सअ‍ॅप तुम्हाला पोलसाठी प्रश्न देण्यास आणि उत्तरे जोडण्यास सांगेल. व्हॉट्सअ‍ॅप उत्तर म्हणून १२ पर्याय देत असल्याचे दिसून आले आहे.
  • पोल झाल्यानंतर सेंडवर टॅप करा. ग्रुप किंवा चॅटमधील सहभागी युजर्सना नंतर पोलमधील उत्तरे निवडता येतील.

(नेटफ्लिक्सचा पासवर्ड शेअर केलाय? नको असलेल्या लोकांना असे करा साईन आऊट)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मतदान पाहण्यासाठी पोलमध्ये पर्याय देण्यात आला आहे. व्हॉट्सअ‍ॅप प्रतिसादाच्या पुढे मतांची संख्या देखील दर्शवते. ग्रुपच्या अ‍ॅडमिनसाठी हे फीचर फायदेशीर ठरू शकते. काही महत्वाच्या मुद्द्यांवर त्यांना पोल घडवता येऊ शकतील.