फेसबूक हे मेटाचे सर्वात लोकप्रिय प्लॅटफॉर्म आहे. या सोशल मीडिया ॲपचे जगभरात २ बिलीयनपेक्षा अधिक युजर्स आहेत. यामुळे जगात कुठेही वास्तव्यास असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीशी सहज संपर्क साधणे, त्या व्यक्तीशी मैत्री करणे सहज शक्य झाले आहे. फेसबूककडुन युजर्सना अधिक आकर्षित करण्यासाठी सतत नवनवे फीचर्स लाँच केले जातात. तसेच हॅकर्सपासून सर्व अकाउंट सुरक्षित ठेवण्यासाठी मेटाकडुन सतत कारवाई केली जाते. पण तरीही अनेकवेळा फेसबूक अकाउंट हॅक झाल्याचे आपण ऐकतो. तंत्रज्ञानाचा गैरफायदा घेत हे हॅकर्स अकाउंट हॅक करण्याचे नवे मार्ग शोधून काढतात. हॅकर्सपासून फेसबूक अकाउंट वाचवण्यासाठी तुम्ही हे अकाउंट व्हेरीफाय करू शकता. यासाठी कोणत्या
फेसबूक अकाउंट व्हेरीफाय करण्यासाठी या स्टेप्स वापरा
- फेसबूक अकाउंटमध्ये लॉग इन करून, उजव्या बाजुला वर असणाऱ्या तीन आडव्या रेषांवर क्लिक करा.
- यामध्ये सेटिंग्स अँड प्रायवसी (Settings and Privacy) या पर्यायावर क्लिक करा.
- त्यामध्ये पर्सनल अँड अकाउंट इन्फोरमेशन (Personal And Account Information) या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर आयडेंटीटी कन्फर्मेशन (Identity Conformation) मधील कन्फर्म आयडी (Confirm ID) पर्याय निवडा.
- त्यानंतर देशाचे नाव टाकुन पॅन कार्ड आणि वोटर आयडी क्रमांक टाका.
- त्यांनंतर ‘फोटो आयडी’साठी काही डॉक्युमेंट सबमिट करावे लागतील. यामध्ये आधार कार्ड स्विकारले जात नाही, तर पॅन कार्ड, वोटर आयडी कार्ड, ड्रायविंग लायसेन्स, पासपोर्ट फोटो पेज हे डॉक्युमेंट सबमिट करता येतात.
- जर तुमचे डॉक्युमेंट्स नीट असतील तर ४८ तासांमध्ये तुमचे अकाउंट व्हेरिफाय केले जाईल.
- या स्टेप्स वापरून तुम्ही हॅकर्सपासून तुमचे फेसबूक अकाउंट सुरक्षित करू शकता.