iQoo ही एक लोकप्रिय मोबाइल उत्पादक कंपनी आहे. कंपनी नवनवीन स्मार्टफोन्स लॉन्च करत असते. ज्यामध्ये अनेक नवीन फीचर्स आणि अपडेट्स ऑफर केले जातात. iQoo कंपनी पुढील आठवड्यामध्ये आपली नवीन सिरीज लॉन्च करणार आहे. त्यामध्ये iQoo 12 आणि iQoo 12 Pro या दोन स्मार्टफोन्सचा समावेश असणार आहे. कंपनी आपल्या या नवीन फोनचे डिझाइनबद्दल काही माहिती सोशल मिडीयावर शेअर करत आहे. iQoo 12 सिरीजमधील फोनबद्दलची माहिती मार्केटिंग पोस्टरच्या माध्यमातून समोर आली आहे. या फोनमध्ये ६.७८ इंचाचा डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे. ज्याचा रिफ्रेश रेट हा १४४ Hz इतका असेल. तसेच यामध्ये ५० मेगापिक्सल ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळण्याची शक्यता आहे. या iQoo 12 सिरीजबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
iQoo पुढील आठवड्यात iQoo 12 आणि iQoo 12 Pro लॉन्च करणार आहे. हा फोन गुगलच्या अँड्रॉइड १४ वर चालण्याची शक्यता आहे. तसेच यामध्ये १२० W वायर्ड चार्जिंगचा सपोर्ट मिळण्याची शक्यता आहे. तसेच या सिरीजमध्ये Qualcomm नवीन स्नॅपड्रॅगन 8 जनरेशन 3 SoC चा सपोर्ट मिळण्याची शक्यता आहे. टिपस्टर अभिषेक यादव यांनी iQoo 12 आणि iQoo 12 Pro या फोनबद्दल एक्सवर पोस्ट केली आहे. लीक झालेल्या माहितीनुसार, iQoo १२ सिरीज अँड्रॉइड १४ आणि ६.७८ इंचाच्या डिस्प्लेसह येऊ शकते. ज्यात १४४ Hz इतका रिफ्रेश रेट असेल. iQoo 12 प्रो मध्ये सॅमसंगची E7 AMOLED स्क्रीन येऊ शकते. जमध्ये २ के रिझोल्युशन ऑफर कलेले जाऊ शकते. तर दुसरीकडे iQoo 12 मध्ये १.५ के रिझोल्युशन असलेली BOE OLED स्क्रीन मिळू शकते. याबाबतचे वृत्त gadgets360 ने दिले आहे.
iQoo 12 सिरीजमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा युनिट मिळण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये OIS सह ५० मेगापिक्सलचा प्राथमिक OV50H सेन्सर, ५० मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आणि ६४ मेगापिक्सलचा OV64B टेलीफोटो सेन्सरचा समावेश असू शकतो. दोन्ही फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळू शकतो.
तसेच या दोन्ही फोनमध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर हे फिचर मिळू शकते. प्रो मॉडेलमध्ये IP68 वॉटर रेजिस्टन्स रेटेड बिल्ड मिळू शकते. तसेच कनेक्टिव्हीटी आयआर ब्लास्टर, ब्लूटूथ ५.४ आणि एनएफसी आणि वायफाय ७ या फीचर्सचा समावेश असू शकतो. iQoo 12 Pro मध्ये १२०W वायर्ड चार्जिंगसह ५,१०० mAh क्षमतेची बॅटरी मिळू शकते. तसेच iQoo 12 मध्ये १२० W वायर्ड चार्जिंगसह ५००० mAh क्षमतेची बॅटरी मिळू शकते. यामध्ये ड्युअल स्टिरिओ स्पीकर देखील मिळू शकतात.
कधी होणार लॉन्च ?
iQoo 12 आणि iQoo 12 Pro ७ नोव्हेंबरला लॉन्च होण्याची शक्यता आहे. लॉन्चिंग इव्हेंट चीनमध्ये संध्याकाळी ७ (भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ४.३०) वाजता आयोजित केला जाणार आहे. हे फोन काळ्या, लाल आणि पांढऱ्या शेड्समध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे.