scorecardresearch

Aditya L1 आणि ISRO चं चॅटिंग सुरु; पृथ्वीपासून ५०,००० किमी दुरून पाठवतोय डेटा, ज्यामुळे..

Aditya L1 Mission: १० सप्टेंबर रोजी पृथ्वीपासून ५०,००० किमी पेक्षा जास्त अंतरावर STEPS सक्रिय करण्यात आले. हे अंतर पृथ्वीच्या रेडिएशन बेल्ट क्षेत्राच्या पलीकडे ठेवून पृथ्वीच्या त्रिज्येच्या (रेडियसच्या) आठ पट पेक्षा जास्त आहे.

ISRO Aditya L1 Mission Starts Sending Scientific Data From 50 Thousand Kilometers Away From Earth To Sun Distance
इस्रोच्या माहितीनुसार, स्टेप्सच्या सर्व आवश्यक तपासण्या पूर्ण झाल्या आहेत (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

ISRO Aditya L1 Mission: भारताची पहिली वहिली सौर मोहीम आदित्य एल- १ ने आता वैज्ञानिक डेटा (माहिती) गोळा करण्यास सुरुवात केल्याचे इस्रोकडून सांगण्यात आले आहे. STEPS उपकरणाच्या सेन्सर्सने पृथ्वीपासून ५०,००० किमी पेक्षा जास्त अंतरावरील सुप्रा-थर्मल आणि Ions आणि इलेक्ट्रॉन मोजण्यास सुरुवात केली आहे. हा डेटा शास्त्रज्ञांना पृथ्वीभोवतीच्या कणांविषयी विश्लेषण करण्यास मदत करतो, असे इस्रोने सोमवारी सांगितले आहे. १० सप्टेंबर रोजी पृथ्वीपासून ५०,००० किमी पेक्षा जास्त अंतरावर STEPS सक्रिय करण्यात आले. हे अंतर पृथ्वीच्या रेडिएशन बेल्ट क्षेत्राच्या पलीकडे ठेवून पृथ्वीच्या त्रिज्येच्या (रेडियसच्या) आठ पट पेक्षा जास्त आहे.

इस्रोच्या माहितीनुसार, स्टेप्सच्या सर्व आवश्यक तपासण्या पूर्ण केल्यानंतर, अंतराळयान पृथ्वीपासून ५०,००० किमी पुढे जाईपर्यंत डेटा गोळा करणे चालूच होते. स्टेप्सचे प्रत्येक युनिट सामान्य पॅरामीटर्समध्ये कार्यरत आहे असेही इस्रोने सांगितले आहे.

Fire at Wedding Hall in Iraq
लग्नाच्या हॉलमध्ये भीषण आग, वधू-वरासह १०० जणांचा होरपळून मृत्यू, १५० हून अधिक जखमी
elders saved the child slife Varanasi Viral Video
VIDEO: पावसाच्या पाण्यात विजेचा धक्का बसल्याने तडफडत होता चिमुकला, देवदूत बनून आलेल्या वृद्धांनी वाचवले प्राण
Anil Parab Supreme Court Rahul Narwekar
“सर्वोच्च न्यायालयाच्या खालचं विधानसभा अध्यक्षांचं न्यायालय प्रत्येक आमदाराची…”, अनिल परबांचं मोठं विधान
Parineeti troll
“ही तर हद्द झाली…,” लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी परिणीती चोप्रा ट्रोल, अभिनेत्रीबद्दल नाराजी व्यक्त करत नेटकरी म्हणाले…

STEPS म्हणजे काय?

स्टेप्स हे सुप्रा थर्मल आणि एनर्जेटिक पार्टिकल स्पेक्ट्रोमीटर इन्स्ट्रुमेंट आहे, जे आदित्य सोलर विंड पार्टिकल एक्सपेरिमेंट (ASPEX) पेलोडचा एक भाग आहे. स्टेप्स मध्ये सहा सेन्सर्स आहेत, प्रत्येक सेन्सर वेगवेगळ्या दिशेने निरीक्षण करतो आणि सुप्रा-थर्मल आणि आयन मोजतो. कमी आणि उच्च-ऊर्जा कण स्पेक्ट्रोमीटर वापरून हे मोजमाप केले जाते. पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राच्या उपस्थितीत असलेल्या कणांच्या वर्तनाचे विश्लेषण करण्यासाठी पृथ्वीच्या कक्षेदरम्यान गोळा केलेला डेटा शास्त्रज्ञांना मदत करणार आहे.”

हे ही वाचा<< ISRO Aditya L1: आदित्य एल १ ने पाठवला पहिला वहिला सेल्फी; सूर्याकडे जाण्याच्या प्रवासातील खास Video पाहा

फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी (पीआरएल) द्वारे इस्रो स्पेस अॅप्लिकेशन सेंटर (एसएसी) च्या समर्थनासह स्टेप्स विकसित करण्यात आले आहे. अंतराळयान त्याच्या कक्षेत निश्चित ठिकाणी स्थिरावल्यावर स्टेप्सचे सेन्सर चालू असतील. L1 च्या आसपास गोळा केलेला डेटा अवकाशातील हवामानाविषयी, सौर वारा आणि अॅनिसोट्रॉपी (दिशांनुसार बदलणारे वस्तुमान) याबद्दल माहिती देईल.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-09-2023 at 15:27 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×