आयटी क्षेत्रातली दिग्गज कंपनी अॅक्सेंचरने त्यांच्या कर्मचाऱ्यांना मोठा धक्का दिला आहे. जगावर मंदीचे काळे ढग साचलेले असताना जगभरातील अनेक लहान-मोठ्या कंपन्यांमधील कर्मचारी कपातीच्या घटना थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. अशातच आता अॅक्सेंचरदेखील कर्मचारी कपात करणार आहे. कंपनीने आज (२३ मार्च) म्हटलं आहे की, “ते त्यांच्या १९,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार आहेत.”
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
अॅक्सेंचर कंपनीच्या एकूण कर्मचारी संख्येपैकी २.५ टक्के कर्मचाऱ्यांची कपात केली जाणार आहे. ग्लोबल इकोनॉमिक आउटलूकला कंपनीने यासाठी जबाबदार ठरवलं आहे. याशिवाय कंपनीने त्यांच्या वार्षिक महसूल आणि नफ्यासंदर्भात जाहीर केलेले अंदाज देखील कमी केले आहेत. तंत्रज्ञान बजेट कपातीच्या चिंतेमुळे कंपनीने हा अंदाज कमी केल्याचं बोललं जात आहे.
अॅक्सेंचरला वाटतंय की, लोकल करन्सीमध्ये वार्षिक महसुलात ८ ते १० टक्के वाढ होईल. पूर्वी ही वाढ ८ ते ११ टक्के इतकी होती. तिसऱ्या तिमाहीचा महसूल १६.१ अब्ज डॉलर्स ते १६.७ अब्ज डॉलर्सच्या दरम्यान, असेल असे कंपनीला वाटते.
तिसऱ्या तिमाहीबद्दल कंपनीचा अंदाज
Accenture ने त्यांच्या निवेदनात म्हटलं आहे की, “आम्हाला आशा आहे की, आर्थिक वर्ष २०२३ च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये आमचा महसूल हा १६.१ अब्ज डॉलर्स ते १६.७ अब्ज डॉलर्स इतका असेल. जो स्थानिक चलनात ३ ते ७ टक्क्यांनी वाढला आहे.”
हे ही वाचा >> “…म्हणून नरेंद्र मोदी सतत रागात असतात”, अरविंद केजरीवाल यांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
अलिकडच्या काळात मोठ्या प्रमाणात नोकरकपात करणाऱ्या कंपन्या
अमेझॉन – २७.०००
मेटा – २१.०००
अॅक्सेंचर – १९.०००
अल्फाबेट – १२.०००
मायक्रोसॉफ्ट – १०.०००