रिलायन्स जिओची ब्रॉडबँड सर्विस ‘जिओ फायबर’कडुन सणांच्या दिवसांमध्ये ग्राहकांना अधिक आकर्षित करण्यासाठी मोठी सूट देण्यात आली आहे. या ऑफरमध्ये ग्राहकांना ४,५०० रुपयांचा फायदा होणार आहे. या ऑफरचा लाभ कसा घ्यायचा आणि ही ऑफर कधीपर्यंत सुरू आहे जाणून घ्या.
जिओ फायबर प्लॅन्सवर देण्यात येणारी ही ऑफर ९ ऑक्टोबरपर्यंत उपलब्ध आहे. १ ऑक्टोबरपासून ही ऑफर्स लाईव्ह करण्यात आली होती. काही प्लॅन्सवर युजर्सना ४,५०० रुपयांचा फायदा होणार आहे.
आणखी वाचा : युट्यूबवर विना जाहिरात व्हिडीओ पाहण्यासाठी वापरा ही सोप्पी ट्रिक
जिओ फायबर प्लॅन्स
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
- जिओच्या या ऑफरचा फायदा २ जिओ फायबर प्लॅन्सवर मिळणार आहे.
- या प्लॅन्सच्या किंमती ५९९ आणि ८९९ रुपये आहेत.
- म्हणजेच जिओ फायबर प्लॅनचा ५९९ किंवा ८९९ चा रिचार्ज केल्यानंतर तुम्हाला ४,५०० रुपयांचा फायदा होणार आहे..
- यासाठी कमीतकमी सहा किंवा तीन महिन्यांसाठी असणारा रिचार्ज प्लॅन घ्यावा लागेल.
फायदे
- ५९९ रुपयांचा रिचार्ज केल्यानंतर रिलायन्स डिजिटलवर १००० रुपयांची सूट, ‘मिंतरा’वर १००० रुपयांची सूट, ‘अजितो’वर १००० रुपयांची सूट, Ixigo वर १,५०० रुपयांची सूट देण्यात आली आहे.
- तर ८९९ रूपयांचा रिचार्ज करणाऱ्या युजर्सना रिलायन्स डिजिटलवर ५०० रूपये, ‘मिंतरा’वर ५०० रूपये, ‘अजितो’वर १००० रुपये आणि Ixigo वर १,५०० रुपयांची सूट देण्यात येत आहे.