2GB Daily Data Plans: जर तुमच्या घरात वायफाय नसेल आणि दररोज असणारा मोबाईल डेटा दिवस संपण्यापूर्वीच संपत असेल तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे. तुम्हीही आता दररोज २ जीबी डेटा देणारा प्लॅन शोधत असाल तर आज आम्ही तुम्हाला अशा प्लॅनबद्दल सांगणार आहोत ज्यात रिलायन्स जिओ आणि एअरटेल या दोन्ही कंपन्या दररोज २ जीबी डेटा देतात. जाणून घ्या कोणत्या कंपनीच्या प्लॅनमध्ये काय खास आहे?

Jio 719 प्लॅनचा तपशील

या जीओ प्रीपेड प्लॅनसह, कंपनी आपल्या वापरकर्त्यांना दररोज २ जीबी डेटा, कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस देते.

(हे ही वाचा: नाद खुळा ऑफर… चिनी फोन द्या अन् नवा Made in India फोन घेऊन जा; ‘या’ कंपनीची भन्नाट ऑफर)

Jio 719 प्लॅनची वैधता

या प्लॅनसाठी, कंपनी ८४ दिवसांची वैधता देते आणि दररोज २ जीबी डेटानुसार, हा प्लॅन वापरकर्त्यांना एकूण १६८ जीबी डेटा देतो. जिओ टीव्ही, जिओ सिनेमा व्यतिरिक्त इतर फायद्यांबद्दल सांगायचे तर, तुम्हाला जिओ सिक्युरिटी आणि जिओ क्लाउडमध्ये मोफत प्रवेश मिळेल.

(हे ही वाचा: Reliance Jio चा नवीन रिचार्ज प्लॅन, मिळेल दैनंदिन २.५ GB डेटा आणि वर्षभराची वैधता)

Airtel 839 प्लॅनचा तपशील

या एअरटेल प्रीपेड प्लॅनसह, कंपनी २ जी बी डेटा, सोबत दररोज १०० एसएम एस आणि कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉलिंग सुविधा देत आहे.

Airtel 839 प्लॅनची वैधता

रिलायन्स जिओ प्रमाणे या प्लॅनमध्ये देखील ८४ दिवसांची वैधता असेल, म्हणजेच हा प्लॅन देखील आपल्या यूजर्सना १६८ जीबी डेटा ऑफर करतो. इतर फायद्यांमध्ये ३० दिवसांसाठी अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ (Amazon Prime Video) मोबाइल एडिशन ट्रायल, अपोलो २४/७ सर्कलसर्कलचे ३ महिन्यांचे सदस्यत्व, Shaw Academy येथे मोफत ऑनलाइन अभ्यासक्रम, मोफत Hello Tune, Wink Music आणि FasTag वर रु. १०० कॅशबॅक यांचा समावेश आहे.

(हे ही वाचा: Vivo V23 Pro, V23 भारतात लॉंच: जाणून घ्या स्मार्टफोनची किंमत, फीचर्स आणि अन्य तपशील)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

किमतीमध्ये फरक किती?

Reliance Jio vs Airtel प्लॅनबद्दल बोलायचे झाले तर, दोन्ही प्लॅनसह, वापरकर्त्यांना ८४ दिवसांच्या समान वैधतेसह, २ जीबी डेटा प्रतिदिन मिळत आहे. पण दोन्ही प्लॅनच्या किमती पाहिल्या तर १२० रुपयांचा फरक आहे.