सध्याचा काळ हा टेक्नॉलॉजीचा काळ आहे. सर्वत्र टेक्नॉलॉजीमुळे अनेक कामे सोपी झाली आहेत. सध्याचा काळ AI (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) चा आहे. भारत देखील अत्यंत वेगाने टेक्नॉलॉजीमध्ये प्रगती करत आहे. त्यातच आता कर्नाटक राज्याचे आयटी मंत्री प्रियांक खरगे यांनी सोमवारी कर्नाटक फ्लॅगशिप इव्हेंट, बंगळुरू टेक समिट (Bengaluru Tech Summit (BTS) च्या पुढील तीन एडिशनच्या तारखांची घोषणा केली आहे. कर्नाटक राज्यातील हा टेक्नॉलॉजी इव्हेंट राज्याची राजधानी बंगळुरू येथे होणार आहे.

बंगळुरू टेक समिट यावर्षी २९ नोहेंबर ते १ डिसेंबर या कालावधीमध्ये होणार आहे. तर २०२४ आणि २०२५ या दोन वर्षांच्या एडिशनच्या तारखांची देखील घोषणा करण्यात आली आहे. या एडिशनच्या तारखा १९ ते २१ नोहेंबर अशा असणार आहेत. ”आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थांना पहिल्यापासूनच भागीदारीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. यासाठीच २०२४ आणि २०२५ च्या बंगळुरू टेक समिटच्या तारखांची घोषणा लवकर करण्यात आली आहे.” असे आयटी मंत्री प्रियांक खरगे एका पत्रकार परिषदेत म्हणाले. याबाबतचे वृत्त hindustantimes ने दिले आहे.

हेही वाचा : खुशखबर! Paytm ने लॉन्च केले ‘कार्ड साऊंडबॉक्‍स’; व्यापाऱ्यांना असा होणार फायदा

बंगळुरू हे जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या शहरांपैकी एक आहे. मात्र बंगळुरू शहराला पायाभूत सुविधा, राहणीमान, वाहतूक आणि अन्य गोष्टींमध्ये आव्हानांचा सामना करावा लागत आहे. बंगळुरू टेक समिट म्हणजे नाविन्य, टेक्नॉलॉजी आणि प्रगती या दिशेने कर्नाटक सरकार वाटचाल करत असल्याचा हा पुरावा आहे. असे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काँग्रेसच्या नेतृत्वातील सरकारने १९९२ मध्ये कर्नाटकमधील पहिली आयटी पॉलिसीची सुरुवात केली. हीच पॉलिसी इलेक्ट्रॉनिक्स सिटीच्या विकासाचा आधार ठरली असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे म्हणणे आहे. ”काँग्रेसने नेहमीच राज्यातील राजकीय व्यवस्था, प्रशासनातील स्थिरता दिली आहे. दीर्घ काळापासून आम्ही एक स्थिर आणि अपेक्षित धोरणात्मक वातावरण प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहोत.” असे सिद्धरामय्या म्हणाले.