नुकताच लास वेगास येथे Consumer Eletronic Show पार पडला. हा या वर्षातील सर्वात मोठा टेक शो होता. यामध्ये सर्वच प्रमुख कंपन्यांनी आपले नवनवीन प्रॉडक्ट्स लाँच केले. या शोमध्ये सौंदर्यप्रसाधने क्षेत्रातील दिग्गज L’Oreal कंपनीने HAPTA नावाचे नवीन मेकअप अ‍ॅप्लिकेशन लाँच केले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार HAPTA हा एक “हँडहेल्ड कॉम्प्युटराइज्ड मेकअप अ‍ॅप्लिकेटर आहे. ज्यांच्या हाताची हालचाल मर्यादित स्वरूपात आहे अशा विशेष ग्राहकांसाठी हे अ‍ॅप्लिकेटर आहे. कंपनीने त्याचे ‘ब्रो मॅजिक’, एक स्मार्ट आयब्रो अ‍ॅप्लिकेटर देखील लाँच केले आहे.

HAPTA

हे अ‍ॅप्लिकेटर “बिल्ट-इन स्मार्ट मोशन कंट्रोल्स” वापरते आणि वापरकर्त्यांच्या गतीची श्रेणी वाढवण्यासाठी “सानुकूल करण्यायोग्य संलग्नक” येतो. कंपनी म्हणते की हे गॅझेट ग्राहकांना पॅकेजिंग उघडण्यास आणि मेकअप करण्यास मदत करू शकते. हॅण्डहेल्ड डिव्हाइसमध्ये ३६० डिग्री रोटेशन येते. तसेच यात एक असे फिचर आहे की ज्यामुळे वापरकर्त्याला सेटिंग लॉक करता येईल. हे चार्जिंगवर चालणारे डिव्हाईस असून हे चार्ज होण्यासाठी सुमारे तीन तासांचा कालावधी लागतो. L’Oreal कंपनीने सध्या HAPTA ची किंमत जाहीर केलेली नाही आहे.

हेही वाचा : CES 2023: जगातील सर्वात मोठ्या ‘टेक शो’ मध्ये, चक्क ड्रायव्हरच्या मूडनुसार रंग बदलणारी कारही झाली लाँच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

L’Oreal ब्रो मॅजिक

आपल्या भुवयांना परिपूर्ण आकार देणे ही एक आव्हानात्मक गोष्ट असू शकते. ही एखाद्याच्या दैनंदिन मेकअप करण्याच्या प्रक्रियेत सर्वात जास्त वेळ घेणारी बाब असू शकते. कारण यात अचूकता सर्वात महत्वाची असते. कायमस्वरूपी टॅटूसाठी ओळखल्या जाणार्‍या प्रिंकर या तंत्रज्ञान कंपनीच्या भागीदारीत हे उपकरण विकसित केले गेले आहे.