सोशल मीडियाच्या क्षेत्रातील मातब्बर अशा मेटा कंपनीच्या इन्स्टाग्रामने स्वतःचे थ्रेड हे मायक्रोब्लॉगिंग ॲप लॉन्च केले आहे. ट्विटरच्या इतर स्पर्धकांपेक्षा थ्रेड वेगळे आहे. थ्रेड्स ॲप हे इन्स्टाग्रामचेच दुसरे रूप आहे. फक्त यावर फोटो आणि व्हिडिओ कटेंटऐवजी मजकूर व संवादावर आधारित कटेंटला अधिक प्राधान्य देण्यात येणार आहे. इन्स्टाग्राम अकाउंटचे लॉगिन डिटेल्स वापरून थ्रेड्सवर अकाउंट बनवणे शक्य होणार आहे. थ्रेड्सवर गेल्यानंतर तुम्ही तुमचे विचार मांडू शकता आणि तिथे सुरू असलेल्या चर्चांमध्ये सहभागी होऊ शकता. ‘इन्स्टाग्राम’मध्ये असलेले कमेंट सेक्शन थ्रेड्समध्येही देण्यात आले आहे.

Threads हे ६ जुलै रोजी मेटाने लॉन्च केले आहे. लॉन्च झाल्यानंतरच काही तासांमध्ये १० मिलियन वापरकर्त्यांनी साइन इन केले. थ्रेड्स वापरण्यासाठी वापरकर्त्यांकडे इन्स्टाग्राम अकाउंट असणे आवश्यक आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म दिग्गज कंपनीना किंवा Apps ना १ मिलियन वापरकर्त्यांपर्यंत पोहचण्यासाठी किती कालावधी लागला याबद्दल जाणून घेऊयात. याबाबतचे वृत्त India Today ने दिले आहे.

Morning dizziness reason
सात-नऊ तासांची झोप पूर्ण होऊनही तुम्हाला सकाळी थकवा जाणवतो?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
iphone instagram account using
आयफोनवर एकापेक्षा अधिक इन्स्टाग्राम अकाउंट अ‍ॅड करून त्याचे व्यवस्थापन कसे करावे? जाणून घ्या
How to send photos wirelessly from Android to iPhone, iPhone to Android
ट्रिपवरुन आल्यावर मित्र आयफोनमधल्या फोटोससाठी मागे लागतात? अशा पद्धतीनं झटकन पाठवा फोटो
Health tips diet advice from social media influencers can be harmful
तुम्हीही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचा डाएट सल्ला ऐकत असाल तर सावध व्हा; शरीरावर होऊ शकतो घातक परिणाम
amaltash movie
सरले सारे तरीही…
Anand Mahindra takes a swipe at L&T chairman comment
Anand Mahindra: ‘बायकोला पाहत बसणं मला आवडतं’, आनंद महिंद्रा यांचा उपरोधिक टोला; वर्क लाइफ बॅलन्सवर सडेतोड भूमिका
Viral Girl Shravanis New Video
मित्रांची साथ सोडून देण्याचा चिमुकलीने दिला सल्ला; पण ‘ती’ असं का म्हणाली? Viral Video तून बघा

हेही वाचा : कसे आहे इन्स्टाग्रामचे नवे थ्रेड्स ॲप? ट्विटर आणि यात काय आहे फरक?

ट्विटर

अन्य प्लॅटफॉर्मच्या तुलनेत थ्रेड्सची लोकप्रियता लवकर वाढली आहे. खास करून त्याचा मुख्य प्रतिस्पर्धी असलेल्या ट्विटरविरुद्ध. Statista च्या आकडेवारीनुसार ट्विटरला जुलै २००६५ मध्ये लॉन्च केले गेले. त्यानंतर १ मिलियन वापरकर्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी ट्विटरला सुमारे दोन वर्षे इतका कालावधी लागला.

फेसबुक

फेसबुकची मूळ कंपनी ही मेटाच आहे. फेसबुक सर्वात वेगाने वाढणाऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैकी एक असल्याचा कंपनी दावा करते. फेसबुक लॉन्च केल्यानंतर त्याला १ मिलियन वापरकर्त्यांपर्यंत पोचायला १० महिने इतका वेळ लागला.

इन्स्टाग्राम

इन्स्टाग्राम ऑक्टोबर २०१० मध्ये लॉन्च झाले होते. इन्स्टाग्रामला १ मिलियन वापरकर्त्यांपर्यंत जाण्यासाठी अडीच महिन्याचा कालावधी लागला. १ मिलियन पर्यंत पोचले तरी फोटो शेअरिंग App स्वतंत्रच होते. २०१२ मध्ये फेसबुकने इन्स्टाग्रामला १ बिलियन डॉलरमध्ये खरेदी केले.

नेटफ्लिक्स

नेटफ्लिक्स या OTT प्लॅटफॉर्मला १ मिलियनपर्यंत पोहोचण्यासाठी सडे तीन वर्षांचा कालावधी लागला. हे प्लॅटफॉर्म १९९९ मध्ये ट्विटरच्या आधी ७ वर्षांपूर्वी लॉन्च करण्यात आले होते.

हेही वाचा : Samsung Galaxy M34 5G Vs iQOO Neo 7 Pro 5G: कॅमेरा, बॅटरी आणि फीचर्समध्ये कोणता स्मार्टफोन्स ठरतो बेस्ट? किंमत फक्त…

Netflix प्रमाणे, Spotify हे स्ट्रीमिंग ट्रेलब्लेझर होते. स्पॉटिफायला १ मिलियन वापरकर्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी ५ महिन्यांचा कालावधी लागला. हे २००९ मध्ये लॉन्च झाले होते.

चॅटजीपीटी

१ मिलियन वापरकर्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी थ्रेड्सच्या पाठोपाठ ChatGpt चॅटबॉट येतो. हा AI चॅटबॉट लॉन्च झाल्यानंतर पाच दिवसांमध्येच १ मिलियन वापर्कत्यांपर्यंत पोहोचला होता.

Story img Loader