आपण दिवसभरात अनेक कामांसाठी मोबाईल वापरतो. मोबाईल सतत वापरल्यामुळे त्याची बॅटरी संपण्याची शक्यता असते. अशावेळी चार्जरची सोय आपल्याला आधीच करावी लागते. त्यातही बारीक पीन, पातळ पीन अशी चार्जरचे प्रकार असतात. त्यामुळे बाहेर जाताना आपण एखादेवेळी चार्जर विसरलो तर आपल्या फोनला वापरता येईल असा इतरांचा चार्जर आपल्याला शोधावा लागतो. यामध्ये खूप वेळ वाया जातो. यावर आता कायमस्वरूपी उपाय करण्यात येणार आहे. मोदी सरकार याबाबत एक नवा नियम आणण्याच्या तयारीत आहे.

मोबाईलसाठी लवकरच कॉमन चार्जर सादर केला जाऊ शकतो

मोदी सरकार लवकरच सर्व मोबाईल्सना वापरता येईल असा कॉमन चार्जर आणण्याच्या तयारीत आहे. केंद्र सरकार आणि इंडस्ट्री स्टेकहोल्डर्स यांच्यामध्ये याबाबत एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मोबाईलसह इतर पोर्टेबल डिवाइससाठी वापरले जाणारे कॉमन चार्जर यावर चर्चा झाली. कंज्युमर अफेअर सेक्रेटरी रोहित कुमार सिंग यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.

आणखी वाचा – Redmi 5G स्मार्टफोन मिळतोय बेस्ट ऑफरसह; जाणून घ्या किंमत आणि बरंच काही..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या बैठकीमध्ये पोर्टेबल उपकरणांचे तज्ञ, सीआयआय व एफआयसीसीआयचे प्रतिनिधी, आयआयटी दिल्ली आणि आयआयटी बीएचयूच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. भारतात एक कॉमन चार्जर वापरण्याची ही योजना कशाप्रकारे अंमलात आणता येईल याबाबत बैठकीमध्ये चर्चा झाली. युरोपमध्ये याआधीच अशी संकल्पना राबवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. अनेक चार्जर्स ऐवजी जेव्हा एकच चार्जर वापरात येईल तेव्हा इ-कचऱ्याचा भार कमी होईल. तसेच ग्राहकांसाठी देखील हे फायदेशीर ठरेल.