बार्सिलोना येथे या वर्षातील सर्वात मोठा मोबाईल शो MWC 2023 सुरु आहे. हा सो २७ फेब्रुवारी ते २मार्च असा होणार आहे. यामध्ये अनेक कंपनी आपले स्मार्टफोन्सच्या सिरीज आणि डिव्हाईस लॉन्च करणार आहेत. या शो मध्येच one plus कंपनीने आपला OnePlus 11 concept (कन्सेप्ट) स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन एका कूलिंग सिस्टिमसह येतो. ही सिस्टीम फोनच्या मागील पॅनलवर देण्यात आली आहे. OnePlus ने अलीकडेच OnePlus 11 5G हा फोन अनेक फीचर्ससह लॉन्च केला आहे. ज्यामध्ये Qualcomm आणि परफेक्ट वर्ल्ड गेम्सच्या पार्टनरशिपमध्ये विकसित करण्यात आले आहे.
कंपनीच्या मते हा OnePlus 11 कन्सेप्ट स्मार्टफोनसह येणारी कूलिंग सिस्टीम फोनला २.१ डिग्री सेल्सिअस पर्यंत कूलिंग करू शकते. यामध्ये इंडस्ट्रियल सिरॅमिक पिझोइलेक्ट्रिक मायक्रोपंप देण्यात आले आहेत. व प्लस कंपनीने या कूलिंग सिस्टिमसह फ्रेमरेट सुधारण्याचा दावा केला आहे. हा फोन चार्जिंग लावला असताना देखील ही कूलिंग सिस्टीम फोनला १.६ डिग्री सेल्सिअस पर्यंत थंड करू शकते. OnePlus 11 कन्सेप्ट स्मार्टफोनमध्ये ग्लास युनिबॉडी डिझाइन आणि मेटल-अलॉय कोटिंग देण्यात आले आहे.
वन प्लस कंपनीने आपल्या या फोनच्या सर्वच फीचर्सबद्दल माहिती दिलेली नाही. पण अशी अपेक्षा आहे की हा फोन Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसरसह लॉन्च केला जाऊ शकतो. या शो मध्ये OnePlus 45W लिक्विड कूलर थर्मोइलेक्ट्रिक कूलर देखील लॉन्च करण्यात आला आहे.