इंस्टाग्रामची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे आणि यामुळे या अ‍ॅपच्या वापरकर्त्यांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. पण काही मंडळी अशी देखील आहेत जे आता इंस्टाग्रामला कंटाळले आहेत आणि सध्या ते या अ‍ॅपपासून ब्रेक घेण्याचा विचार करत आहेत. याचसाठी ते इंस्टाग्राम अकाउंट डिलीट करू इच्छित आहेत. परंतु इंस्टाग्राम अकाउंट डिलीट करणं इतकं सोपं नाही. मोबाईल अ‍ॅपवर अकाउंट डिलीट करण्यासाठी अद्याप कोणतंही फीचर उपलब्ध नाही. ही सुविधा मोबाईल ब्राऊजरवर किंवा कंप्यूटरच्या इंटरनेट ब्राऊजरवर उपलब्ध आहे. या प्रक्रियेसंबंधी सातत्याने मिळालेल्या तक्रारीनंतर आता इंस्टाग्राम आपल्या वापरकर्त्यांसाठी खास फीचर आणण्याच्या तयारीत आहे. या फीचरच्या मदतीने तुम्ही तुमचे इंस्टाग्राम अकाउंट आपल्या मोबाईल अ‍ॅपमधूनही डिलीट करू शकणार आहात.

कसे असेल नवे फीचर?

रिपोर्टनुसार, मेटाच्या मालकीची ही कंपनी वापरकर्त्यांना नवनवीन फीचर्स देत असते. अकाउंट डिलीट करण्याच्या पर्यायाची मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत आहे. अशातच कंपनीने आता यावर काम करण्यास सुरुवात केली आहे. सध्या या फीचरवर टेस्टिंग केली जात असून लवकरच हे फीचर इंस्टाग्रामच्या वापरकर्त्यांसाठी उपलब्ध केले जाईल. या पर्यायामुळे वापरकर्त्यांसाठी आपले इंस्टाग्राम अकाउंट डिलीट करणे सोयीचे होणार आहे.

नवे फीचर असे करेल काम

या नव्या फीचरनुसार, तुम्हाला तुमचे इंस्टाग्राम अकाउंट डिलीट करण्यासाठी तुमच्या प्रोफाइलमध्ये जावे लागेल. तिथून तुम्हाला सेटिंग या पर्यायात जायचे आहे. यानंतर अकाउंट या पर्यायावर क्लिक करावे. इथेच तुम्हाला ‘डिलीट युअर अकाउंट’ (Delete Your account) हा नवा पर्याय दिसेल. परंतु अद्याप हा पर्याय सर्वांसाठी उपलब्ध करण्यात आलेला नाही. हा पर्याय रिलीज झाल्यानंतरच सर्वांसाठी उपलब्ध होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.