OnePlus ही एक मोबाईल उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन फीचर्स असलेले स्मार्टफोन्स लाँन्च करत असते. तसेच वनप्लस लॅपटॉप, स्मार्टफोन्स , स्मार्ट टीव्ही आणि इतर प्रॉडक्ट्स तयार करते. वनप्लस कंपनीने नुकताच आपला नवीन स्मार्ट टीव्ही लॉन्च केला आहे.

वनप्लसने शेवटी आपला ६५ इंचाचा स्मार्ट टीव्ही भारतात लॉन्च केला आहे. हा स्मार्ट टीव्ही क्लाउड कंपनीने क्लाउड 11 इव्हेंटमध्ये लॉन्च केला आहे. त्या इव्हेंटमध्ये कंपनीने याव्यतिरिक्त OnePlus 11 5G, OnePlus 11R, OnePlus Buds Pro 2, OnePlus Keyboard 81 Pro आणि Oneplus Pad 5G देखील लॉन्च केले आहेत. तर या स्मार्ट टीव्हीचे फीचर्स किंमत आणि अधिक माहिती जाणून घेऊयात.

हेही वाचा : OnePlus Event: कंपनी करणार OnePlus 11 सह अनेक प्रॉडक्ट्सचे लॉन्चिग, जाणून घ्या फीचर्स अन्…

OnePlus TV 65 Q2 चे फीचर्स

OnePlus TV 65 Q2 Pro हा कंपनीचा फ्लॅगशिप टीव्ही आहे. मागच्या सिरीजच्या तुलनेमध्ये यामध्ये कंपनीने नवीन फीचर्स अपडेट केली आहेत. हा स्मार्टटीव्ही ६५ इंचाचा असून यामध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 4K असा QLED डिस्प्ले येतो. याचे स्क्रीन रिझोल्युशन हे ३८४०x २१६० इतके आहे. हा स्मार्ट टीव्ही अँड्रॉइड वर आधारित असून हा OxygenPlay 2.0 चालतो.

OnePlus TV 65 Q2 Pro हा स्मार्ट टीव्ही AVI, MKV, MP4 आणि WMV व्हिडिओ फॉरमॅटसह डॉल्बी अ‍ॅटमॉस साउंड सिस्टिमला स्पोर्ट करतो. यामध्ये वापरकर्त्यांना वाय-फाय सपोर्ट आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी हे फीचर्स देखील मिळतात.

हेही वाचा :गुगलला विसरून जा! ChatGPT सह Microsoft लवकरच लॉन्च करणार New Bing आणि Edge ब्राउझर

OnePlus TV 65 Q2 ची किंमत

OnePlus TV 65 Q2 Pro हा स्मार्ट टीव्ही भारतात लॉन्च करण्यात आला आहे. यया स्मार्ट टीव्हीच्या प्री-ऑर्डर ६ मार्चपासून सुरु होणार आहेत. तसेच १० मार्चपासून ते बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. या टीव्हीची स्पर्धा भारतातील सोनी , सॅमसंग या ब्रॅण्डशी होणार आहे. या स्मार्ट टीव्हीची किंमत ९९,९९९ रुपये इतकी आहे.