Online Payment Rules to change from January 1, 2022: देशातील वाढत्या डिजिटल वापरामुळे, अधिकाधिक लोक अगदी घरचा किराणामाल भरण्यापासून ते कॅब बुक करण्यासाठी ऑनलाइन पेमेंटचा वापर करत आहेत. परंतु डिजिटल जग सायबर गुन्हेगारीनेही भरलेले आहे, जे नेहमी वापरकर्त्यांच्या डेटामध्ये प्रवेश मिळविण्याची वाट पाहत असतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकांना चांगली सुरक्षा प्रदान करण्यासाठी आणि ऑनलाइन पेमेंट सुरक्षित करण्यासाठी, भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने सर्व व्यापारी आणि पेमेंट गेटवे यांना ग्राहकांचे संवेदनशील तपशील आणि त्यांच्या शेवटी सेव्ह केलेले डेबिट आणि क्रेडिट कार्डचे तपशील हटविण्यास सांगितले आहे. म्हणजेच आरबीआयच्या आदेशानंतर, व्यापारी आणि पेमेंट गेटवे यांना त्यांच्या सर्व्हरवर साठवलेली सर्व माहिती हटवावी लागेल. याचा अर्थ व्यापारी वेबसाइटवर पेमेंट करण्यासाठी वापरकर्त्याला संपूर्ण कार्ड तपशील एंटर करणे आवश्यक आहे.

(हे ही वाचा: Google Pay New Rule : १ जानेवारीपासून ऑनलाइन पेमेंटशी संबंधित ‘हे’ नियम बदलणार)

बँकांनी त्यांच्या ग्राहकांना या बदलांची माहिती देण्यास सुरुवात केली आहे. अनेक अग्रगण्य बँकांआपल्या ग्राहकांना संदेश पाठवत आहे की त्यांना एकतर संपूर्ण कार्ड तपशील एंटर करावे लागतील किंवा टोकन निवडावे लागेल.

टोकनायझेशन म्हणजे काय?

सध्याच्या प्रणालीनुसार, व्यवहाराची अंमलबजावणी १६-अंकी कार्ड क्रमांक, कार्ड एक्सपायरी तारीख, CVV आणि वन-टाइम पासवर्ड किंवा OTP (काही प्रकरणांमध्ये व्यवहाराचा पिन देखील) च्या योग्य मूल्यांवर आधारित आहे. टोकनायझेशन म्हणजे मूळ कार्ड क्रमांकाला पर्यायी कोडने बदलणे, ज्याला “टोकन” म्हणतात.

(हे ही वाचा: पोलिसांनी २२ कोटींहून अधिक चोरीचे पासवर्ड केले ‘दान’; तुमचा पासवर्ड हॅक झाला आहे की नाही ते ‘असं’ तपासा)

१ जानेवारीपासून काय बदल होणार?

जानेवारीपासून, जेव्हा तुम्ही व्यापाऱ्याला पहिले पेमेंट करता, तेव्हा तुम्ही प्रमाणीकरणाच्या अतिरिक्त घटकासह (AFA) तुमची संमती देणे आवश्यक आहे. एकदा पूर्ण झाल्यावर, तुम्ही तुमच्या कार्डचा CVV आणि OTP टाकून पेमेंट पूर्ण कराल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Online payment rules the rules will change from january 1 know the details ttg
First published on: 23-12-2021 at 11:15 IST