Google Rule change: आता देशातील अधिकाधिक लोक डिजिटल पेमेंटकडे वळले आहेत. यामुळेच, त्याच्याशी संबंधित अनेक अॅप्स (Digital Payment Apps) अधिकृत म्हणून देखील जारी करण्यात आले आहेत, ज्यांचा वापर देखील मोठ्या प्रमाणात केला जात आहे. यामुळे तुम्ही डिजिटल वॉलेटद्वारे कुठेही पैसे देऊ शकता, जे सुरक्षिततेच्या दृष्टीने देखील चांगले आहे. देशात गुगल पे वापरकर्ते जास्त आहेत. गुगल पे वापरणाऱ्या युजर्ससाठी एक मोठी बातमी आहे. कंपनी लवकरच आपले नियम बदलणार आहे. या बदलाचा परिणाम १ जानेवारीपासून करोडो यूजर्सवर दिसून येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोणत्या कोणत्या गोष्टींवर होणार परिणाम?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांवर गुगलचे (Google) काही नियम बदलले जात असल्याची चर्चा आहे. ऑनलाइन पेमेंट करणाऱ्या वापरकर्त्यांवर या बदलाचा साधा परिणाम होईल. हे नवीन नियम गुगल जाहिराती (Google Ads), युट्युब (YouTube), गुगल प्ले स्टोअर (Google Play Store) आणि गुगल पे (Google Pay) इत्यादींसह सर्व गुगल सेवांवर लागू होईल.

( हे ही वचा: Reliance Jio चा मोठा धमाका! आता करा फक्त १ रुपयाचा रिचार्ज, आहे ३० दिवसांची वैधता)

नवा नियम १ जानेवारीपासून लागू होणार

नवीन नियम १ जानेवारी २०२२ पासून लागू होतील आणि त्यानंतर गुगल आपल्या ग्राहकांच्या कार्ड तपशीलांचा डेटा सेव्ह करणार नाही. आत्तापर्यंत गुगल आपल्या ग्राहकांच्या पेमेंटशी संबंधित सर्व डिटेल जसे की कार्ड नंबर, एक्सपायरी डेट जतन करत असे. पण भविष्यात असे होणार नाही. हा नियम लागू केल्यानंतर, वापरकर्त्यांना गुगल पेवरून पेमेंट करताना त्यांचे कार्ड डिटेल पुन्हा एंटर करावे लागतील. त्यानंतरच तुम्ही पेमेंट करू शकाल. गुगल पेच्या मॅन्युअल ऑनलाइन पेमेंटच्या नियमांमध्ये करण्यात आला आहे.

( हे ही वाचा: Aadhaar-Voter ID Linking: व्होटर कार्डला आधार कसं लिंक करायचं? जाणून घ्या स्टेप्स)

गुगलचे नवीन नियम लागू झाल्यावर त्याचा थेट परिणाम गुगल पे वापरणाऱ्या लाखो वापरकर्त्यांवर होईल. कारण यानंतर ते त्यांचे कार्ड तपशील सेव्ह करू शकणार नाहीत आणि पेमेंट करण्यापूर्वी त्यांना पुन्हा पुन्हा डिटेल टाकावा लागेल. याचा अर्थ तुम्हाला तुमच्या कार्डची एक्सपायरी डेट आणि कार्ड नंबर दोन्ही लक्षात ठेवावे लागेल. तुम्ही MasterCard किंवा Visa वापरत असल्यास, तुम्हाला कार्डचे तपशील नवीन फॉरमॅटमध्ये सेव्ह करण्यासाठी अधिकृत करणे आवश्यक आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Google pay new rule from january 1 the this rule regarding online payments will change ttg
First published on: 22-12-2021 at 11:31 IST