Oppo Reno 7 5G Launching Date : चिनी कंपनी Oppo ने भारतात आपल्या Reno 7 सीरीज स्मार्टफोनची लॉन्चींग डेट कन्फर्म केली आहे. या सीरिजचा स्मार्टफोन कंपनीने गेल्या वर्षीच लॉन्च केला होता. यामध्ये Oppo Reno 7 5G, Oppo Reno 7 Pro 5G आणि Oppo Reno 7SE 5G स्मार्टफोनचा समावेश आहे. या स्मार्टफोन्सच्या किंमतीबाबत माहिती देखील लीक झाली होती. असेही सांगितलं जात होतं की, या फोनचे फिचर्स चिनी व्हेरिएंटसारखेच असेल. Oppo Reno 7 5g स्मार्टफोन सीरीजबद्दल सर्व काही जाणून घेऊया.

Vivo company New Smartphone T3x 5G launch in India on Know About design and price range of this upcoming model
50MP कॅमेरा अन् फास्ट चार्जिंग सपोर्टसह विवोचा ‘हा’ स्मार्टफोन होणार लाँच; किंमत फक्त…
Motorola launches Edge 50
बाकी कंपन्यांची उडाली झोप, मोटोरोलाचा जबरदस्त डिस्प्लेसह स्मार्टफोन देशात दाखल, मिळताहेत भरमसाठ ऑफर्स
spmcil recruitment 2024 jobs in security printing and minting corporation of India ltd
नोकरीची तयारी : सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमधील संधी
Dharavi slum tour
धारावीला ‘झोपडपट्टी टूर’ म्हणत नाव ठेवणाऱ्या परदेशी इन्फ्ल्युएन्सरवर संतापले नेटकरी, म्हणाले, “ही मस्करी करतेय का?”

Oppo Reno 7 5G ची फिचर्स | Oppo Reno 7 5G Specifications
ट्विटरवर माहिती देताना ओप्पो इंडियाने म्हटले आहे की, हे स्मार्टफोन्स लवकरच भारतात लॉन्च केले जाईल. हा फोन फ्लिपकार्ट सेल दरम्यान खरेदी केला जाऊ शकतो. या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 778G प्रोसेसर दिला जाईल. यामध्ये, प्रो मॉडेल मीडियाटेक डायमेंसिटी १२०० मॅक्स प्रोसेसरसह सादर करण्यात आले. मायक्रोसाइटवर हे उघड झाले आहे की, फ्रंट कॅमेरा सोनी IMX709 अल्ट्रा-सेन्सिंग सेन्सरसह 32MP दिला जाईल. याशिवाय, त्याचा मुख्य कॅमेरा (फ्लॅगशिप Sony IMX766 सेंसर) 50MP चा असेल, जो Oppo Reno 7 Pro मध्ये मिळेल.

आणखी वाचा : Provident Fund खात्यात मोठी रक्कम जमा केली आहे, पण बॅलन्स चेक करता येत नाही? मग हा सोपा मार्ग वापरा

कंपनीने काय म्हटलंय?
स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याबद्दल माहिती देताना कंपनीने सांगितले की, त्याच्या कॅमेऱ्याला मोस्ट अॅडव्हान्स्ड रेनो कॅमेरा सिस्टम देण्यात येणार आहे. कंपनीचा दावा आहे की, हा देशातील पहिला स्मार्टफोन आहे, ज्यामध्ये एवढा अत्याधुनिक कॅमेरा दिला जाईल. यासोबतच यामध्ये आणखी अनेक सेन्सर्स देण्यात येणार आहेत. Reno 7 5G पुन्हा डिझाइन केले जाईल. तर Reno 7 Pro 5G लीग ऑफर लीजेंड एडिशन काही खास सामग्रीसह येईल. रॉकेट तोफेच्या आकाराचा बॉक्स, थीम्स आणि अनेक खास गोष्टी असतील.

आणखी वाचा : Aadhaar : आधार कार्डचे डिटेल्स चुकीच्या हातात तर नाही ना गेले? अशा पद्धतीने तपासा

किंमत काय असू शकते?
या स्मार्टफोन्सच्या किंमतीबद्दल बोलायचं झालं तर, नुकत्याच समोर आलेल्या रिपोर्टनुसार, Oppo Reno 7 5G फोनची किंमत २८,००० ते ३१,००० रुपयांच्या दरम्यान असू शकते. त्याच वेळी, Oppo Reno 7 Pro 5G ची किंमत ४१,००० ते ४३,००० रुपयांच्या दरम्यान असू शकते. हे स्मार्टफोन अनेक कलर व्हेरिएशनमध्ये आणले जाणार आहेत.