भविष्य निर्वाह निधी (पीएफ) खात्यातील बॅलन्स तपासणं खूप सोपं आहे. तुम्ही हे उमंग अॅपद्वारे तपासू शकता, बॅलन्स तपासण्यासाठी या अॅपव्यतिरिक्त सुद्धा अनेक सोपे मार्ग आहेत. उदाहरणार्थ, एसएमएस, मिस्ड कॉलद्वारे किंवा EPFO वेबसाइटवरून.
यासाठी तुमचे EPFO म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेमध्ये खाते असणे आवश्यक आहे. पीएफ खात्याचा सर्वात मोठा आणि उत्तम फायदा म्हणजे बॅंकांच्या तुलनेत व्याजदर जास्त असतं. जवळपास साडेआठ टक्क्यांपर्यंत हे व्याजदर मिळतं.
तुम्ही PF बॅलन्स कोणत्या मार्गांनी तपासू शकता?
- जर तुम्ही हे काम उमंग अॅपच्या माध्यमातून करत असाल तर आधी तुम्हाला ते Google Play Store किंवा Apple App Store वरून डाउनलोड करावे लागेल. त्यानंतर लॉगिन केल्यानंतर बॅलन्स तपासण्यासाठी तुम्हाला UAN आणि OTP (वन टाइम पासवर्ड) टाकावा लागेल.
- जर तुम्हाला हे काम एसएमएसद्वारे करायचे असेल तर तुम्हाला एका नंबरवर एसएमएस पाठवावा लागेल. हा क्रमांक ७७३८२९९८९९ आहे. यावर तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून (UAN वरून) ‘EPFOHO UAN ENG’ पाठवावे लागेल. संदेशाच्या शेवटी असलेल्या तीन वर्णांचा अर्थ तुम्हाला ज्या भाषेत सूचना संदेश प्राप्त करायचा आहे. ही सेवा हिंदी, बंगाली, तमिळ, मराठी, गुजराती, कन्नड, पंजाबी, तेलुगू आणि मल्याळम या नऊ भाषांमध्ये उपलब्ध आहे.
- तुम्हाला मिस्ड कॉलद्वारे पीएफ खात्यातील बॅलन्स जाणून घ्यायची असेल, तर तुम्हाला ०११-२२९०१४०६ या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल. लक्षात ठेवा की, तुम्ही ज्या नंबरवरून मिस्ड कॉल द्याल तो UAN नोंदणीकृत मोबाइल नंबर असावा, त्यानंतर तुम्हाला एसएमएसच्या स्वरूपात बॅलन्सची माहिती दिली जाईल.
- जर तुम्हाला हे काम ईपीएफओच्या वेबसाइटच्या मदतीने करायचे असेल तर तुम्हाला ईपीएफओच्या साइटवर जावे लागेल. नंतर ‘अवर सर्विसेज’ टॅबवर क्लिक करा आणि पुढे ‘‘फॉर एंप्लाइज’ निवडा. पुढे तुम्हाला “मेंबर पासबुक” पर्यायावर जाऊन UAN आणि पासवर्ड टाकावा लागेल. हे करताच ई-पासबुक तुमच्या समोर येईल.
EPFO ने नोव्हेंबर, २०२१ मध्ये १३.९५ लाख नवीन सदस्य जोडले
EPFO ने नोव्हेंबर, २०२१ मध्ये १३.९५ लाख सदस्य जोडले, जे एका वर्षापूर्वीच्या याच कालावधीपेक्षा सुमारे ३८ टक्के अधिक आहे. निश्चित वेतनावर (वेतन) ठेवलेल्या कर्मचाऱ्यांच्या ताज्या आकडेवारीवरून ही माहिती मिळाली आहे. EPFO च्या तात्पुरत्या पगाराच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये १३.९५ लाख सदस्य जोडले गेले. हे ऑक्टोबर २०२१ च्या तुलनेत २.८५ लाख किंवा २५.६५ टक्के जास्त आहे.
खरं तर, कामगार मंत्रालयाने गुरुवारी एका निवेदनात म्हटले आहे की, “वार्षिक आधारावर तुलना करता, भागधारकांच्या संख्येत ३.८४ लाख वाढ झाली आहे. EPFO ने नोव्हेंबर २०२० मध्ये एकूण १०.११ लाख ग्राहक जोडले होते.” हे आकडे देशातील संघटित रोजगाराच्या स्थितीबद्दल माहिती देतात. नोव्हेंबर २०२१ मध्ये जोडलेल्या एकूण १३.९५ सदस्यांपैकी ८.२८ लाख सदस्य प्रथमच EPFO च्या सामाजिक सुरक्षा कवचाखाली आले आहेत.