जिओ, एअरटेल, व्हीआय,बीएसएनएल हे चार दूरसंचार ऑपरेटर प्रामुख्याने भारतामध्ये सक्रिय आहेत. देशातील जवळपास करोडो लोकसंख्या या कंपन्यांचे मोबाईल नंबर चालवते. दररोज शेकडो नवीन सिमकार्ड जारी केले जातात आणि नवीन मोबाइल नंबर सादर केले जातात. त्यांच्या वापरकर्त्यांच्या सोयीसाठी, या दूरसंचार कंपन्या किमान कागदपत्रांच्या प्रक्रियेत सिम कार्ड विकण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून त्यांचा वापरकर्ता आधार वाढू शकेल. मात्र भारत सरकारने सिमकार्डचे नियम बदलले आहेत. नवीन नियमानुसार, १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या ग्राहकांना नवीन सिम विकता येणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सिमकार्डच्या नियमांमध्ये बदल झाल्यानंतर नवीन सिम मिळवणे अनेकांसाठी सोपे झाले असले तरी काही ग्राहकांसाठी नवीन सिमकार्ड मिळवणे अवघड झाले आहे. या नियमांमधील सर्वात मोठे अपडेट म्हणजे भारतात १८ वर्षांखालील मोबाइल वापरकर्ते यापुढे स्वत:साठी कोणत्याही कंपनीचे कोणतेही सिम कार्ड खरेदी करू शकणार नाहीत. Reliance Jio, Airtel, Vodafone Idea आणि BSNL हे १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या ग्राहकांना सिम कार्ड विकू शकत नाहीत.

( हे ही वाचा: e-SIM म्हणजे काय? जाणून घ्या ते कसे आणि कुठे खरेदी करायचे)

‘या’ वापरकर्त्यांना नवीन सिम मिळणार नाही

मंत्रिमंडळाने सप्टेंबर २०२१ रोजी मंजूर केलेल्या दूरसंचार सुधारणांनुसार, दूरसंचार विभागाचे नियम या तीन परिस्थितींमध्ये ग्राहकांना नवीन सिम कार्ड देण्यास प्रतिबंधित आहेत.

  • दूरसंचार विभागानुसार, कोणतीही कंपनी १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या वापरकर्त्यांना नवीन सिम देणार नाही.
  • नियमांनुसार, मानसिक आजारी किंवा मानसिकदृष्ट्या अस्थिर व्यक्तीलाही नवीन सिमकार्ड दिले जाणार नाही.
  • ज्यांना आधार आधारित ई-केवायसी मिळत नाही त्यांनाही नवीन सिम जारी केले जाणार नाही.

ऑनलाइन सिम अर्ज करा

सिमकार्ड देण्याच्या नियमात बदल करताना सरकारने १८ वर्षांवरील लोकांना अडचणीत टाकले आहे. दुसरीकडे, १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींसाठी नवीन सिम कार्ड खरेदी करण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. नवीन नियमांनुसार, कोणताही भारतीय नागरिक त्याच्या घरी बसून नवीन सिमकार्डसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतो. ऑनलाइन सिम अर्ज केल्यानंतर ते सिमकार्डही घरपोच मिळेल.

( हे ही वाचा: २८,००० रुपयांच्या सवलतीसह मिळतोय iPhone 12 5G; जाणून घ्या संपूर्ण ऑफर)

नवीन सिमसाठी आधार आधारित ई-केवायसी आवश्यक आहे

नवीन सिमकार्ड मिळणे आता सर्वसामान्यांसाठी सोपे झाले असले तरी या प्रक्रियेसाठी कोणत्याही मोबाईल शॉपी किंवा किरकोळ दुकानात जाण्याची गरज नाही. नवीन मोबाईल कनेक्शन म्हणजेच नवीन सिम मिळविण्यासाठी, एखाद्याला UIDAI च्या आधार आधारित ई-केवायसी सेवेतून जावे लागेल. या प्रक्रियेत, मोबाइल वापरकर्त्याला १ रुपये शुल्क भरावे लागेल आणि त्याशिवाय कोणताही फोटो किंवा आयडी दुकानात जमा करावा लागणार नाही. डिजीलॉकरमध्ये साठवलेले कोणतेही दस्तऐवज या केवायसीमध्ये उपयुक्त ठरतील आणि काम ऑनलाइन केले जाईल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Persons under the age of 18 will no longer receive mobile sim cards gps
First published on: 26-07-2022 at 12:48 IST