scorecardresearch

Poco X5 की Realme 10 Pro: जबरदस्त प्रोसेसर, कॅमेरा अन् बॅटरीमध्ये कोणता आहे बेस्ट स्मार्टफोन; जाणून घ्या फीचर्स आणि..

या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये वापरकर्त्यांना ५०००mAh ची बॅटरी मिळते.

Poco X5 5G v Realme10 Pro 5G camparision
Poco X5 5G v Realme10 Pro 5G – लोकसत्ता ग्राफिक्स टीम

Poco ही एक मोबाईल उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन मॉडेल्स लॉन्च करत असते. आता सुद्धा कंपनीने आपल्या वापरकर्त्यांसाठी एक नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Poco X5 5G असे या फोनचे नाव असून हा भारतात लॉन्च करण्यात आला आहे. पोको कंपनीचा हा स्मार्टफोन Realme च्या Realme 10 Pro स्पर्धा करेल.तर या दोन्ही स्मार्टफोन्समधील बेस्ट स्मार्टफोन कोणता आहे हे जाणून घेऊयात.

POCO X5 vs Realme 10 Pro चे फीचर्स

Poco X5 5G मध्ये तुम्हाला अँड्रॉइड १२ वर आधारित MIUI 13 अपडेट मिळणार आहे. त्याशिवाय या फोनमध्ये ६.७ इंचाचा फुलएचडी + AMOLED स्क्रीन मिळतो. ज्याचा रिफ्रेश रेट हा १२०Hz इतका आहे. फोनमध्ये Snapdragon 695 हा प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच यामध्ये ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटर्नल स्टोरेज उपलब्ध असणार आहे.

रिअलमी १० प्रो या स्मार्टफोनमध्ये ६.७२ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले फुलएचडी + रिझोल्युशन ऑफर करते. स्क्रीनचा रिफ्रेश रेट हा १२०Hz इतका आहे. फोनमध्ये 1mm अल्ट्रा-स्लिम बेझल्स देण्यात आले आहे. Realme 10 Pro स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन Android 13 आधारित Realme UI 4.0 सह येतो.

हेही वाचा : Poco चा ‘हा’ जबरदस्त स्मार्टफोन झाला लॉन्च; फीचर्स पाहून व्हाल आनंदाने वेडे, किंमत तर…

Poco X5 5G या स्मार्टफोनमध्ये तीन रिअर कॅमेरे देण्यात आले आहेत. ज्याची प्रायमरी लेन्स ४८ मेगापिक्सलची आहे. दुसरी ८ मेगापिक्सलची आणि तिसरी लेन्स २ मेगापिक्सलची आहे. सेल्फीसाठी १६ मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये तुम्हाला ५००० mAh ची बॅटरी आणि ३३ W चा फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो. तसेच फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये ब्लूटूथ 5.1, वाय-फाय, जीपीएस आणि एनएफसी हे फिचर उपलब्ध आहेत. या फोनचे एकूण वजन १८९ ग्रॅम इतके आहे.

Realme 10 Pro 5G स्मार्टफोनमध्ये ६.७ इंच फूल एचडी + डिस्प्ले, अँड्रॉइड १३ ऑपरेटिंग सिस्टिमवर आधारित रिअल मी यूआय ४.०, स्नॅपड्रॅगन ६९५ ५जी एसओसी, अड्रिनो ए६१९ जीपीयू, ८ जीबी रॅम, १०८ एमपी प्रायमरी कॅमेरा, सेल्फीसाठी १६ एमपी कॅमेरा, ५००० mAh बॅटरी, ३३ वॉट सुपर व्हीओओसी फास्ट चार्जिंग मिळते. फोन २० मिनिटांमध्ये ५० टक्क्यांपर्यंत चार्ज होतो, असा कंपनीचा दावा आहे.

हेही वाचा : REALME 10 Pro + 5G आणि REALME 10 Pro 5G भारतात लाँच; 108 एमपी कॅमेरा, फास्ट चार्जिंग; काय आहे किंमत? जाणून घ्या

काय आहेत दोन्ही स्मार्टफोनच्या किंमती ?

Poco X5 या स्मार्टफोनमध्ये ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंट तसेच ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटर्नल स्टोरेज या दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन तुम्हला २१ मार्च २०२३ पासून खरेदी करता येणार आहे. याची किंमती अनुक्रमे १८,९९९ रुपये आणि २०,९९९ रुपये इतकी आहे. ICICI बँकेच्या ऑफरसह हा फोन तुम्हाला १६,९९९ रुपयांमध्ये मिळू शकतो.

Realme 10 Pro हा स्मार्टफोन डिसेंबरमध्ये दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला होता. यामधील ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १८,९९९ रुपये आहे. तर ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असणाऱ्या फोनची किंमत १९,९९९ रुपये इतकी आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-03-2023 at 11:09 IST