आपण वेगवेगळ्या कंपन्यांचे स्मार्टफोन वापरत असतो. काही वर्षांनी आपण नवीन मोबाइल खरेदी करतो. प्रत्येकजण त्याला ज्या गोष्टीची जास्त आवश्यकता आहे त्यानुसार तो फोन खरेदी करतो. बहुतेक अँड्रॉइड मोबाइल फोन्समध्ये एक गोष्ट समान असते. ती समान असणारी गोष्ट म्हणजे प्री-इंस्टाल अॅप्स. हे अॅप्स आजकाल जवळजवळ प्रत्येक मोबाइलमध्ये लोड केलेले दिसून येतात. मात्र त्यातील काही अॅप्स दररोजच्या वापरासाठी उपयुक्त असतात. परंतु त्यामध्ये काही उत्पादक तुम्हाला त्यांचे अॅप्स मोबाइलमधून काढून टाकण्याची परवानगी देत नाहीत.
यामध्ये एक उपाय आहे, त्याच्या मदतीने तुम्ही हे अॅप्स तुमच्या फोनच्या होम स्क्रीनवरून आणि अॅप ड्रॉवरमधून काढून टाकू शकता. आज आपण Samsung, Vivo, OPPO, Realme आणि Mi या फोनमध्ये अॅप्स हाईड कसे करायचे याबद्दल जाणून घेणार आहोत.
सॅमसंग फोनमध्ये अॅप्स कसे लपवायचे?
सॅमसंगच्या स्मार्टफोनवर अॅप्स लपवणे सोपे आहे. कंपनीचा OneUI तुम्हाला थेट पर्याय देतो ज्याद्वारे तुम्ही कोणतेही थर्ड पार्टी अॅप्स डाउनलोड न करता सहजपणे लावपू शकता. आपल्याला फक्त या स्टेप्स फॉलो करण्याची आवश्यकता आहे.
१. तुमच्या सॅमसंगच्या फोनवर अॅप ड्रॉवर उघडून उजव्या बाजूला वरील कोपऱ्यात तीन डॉट्स असतील तिथे क्लिक करावे.
२. त्यानंतर तिथे तुम्हाला होम स्क्रीन सेटिंग हा पर्याय दिसेल. तिथे क्लिक करा.
३. त्यानंतर लिस्टमध्ये ‘Hide app’ पर्याय शोधावा.
४. त्या लिस्टमधून तुम्हाला जे अॅप्स लवपायचे आहेत ते सिलेक्ट करा आणि ‘Apply’ बटणावर क्लिक करा. ते अॅप्स तुमच्या होम स्क्रीनवर दिसणार नाहीत.
विवो फोनमध्ये अॅप्स कसे लपवायचे?
Vivo FunTouch OS सुद्धा एक इन बिल्ट फीचरसह येते. ज्याच्या मदतीने तुम्ही अॅप्स लवपू शकता. आता ज्या स्टेप्स आपण पाहणार आहोत त्या केवळ FunTouch OS 9.0 आणि त्यावरील व्हर्जनवर चालणाऱ्या vivo फोनसाठीच असणार आहेत.
१. सर्वात प्रथम vivo फोनमधील सेटिंग पर्याय ओपन करावा. त्यामध्ये फेस आणि पासवर्ड सेक्शनमध्ये जावे.
२. प्रायव्हसी आणि अॅप एन्क्रिप्शन सेटिंगवर क्लिक करा.
३. तिथे तुम्हाला हाईड अॅप दिसतील. ते चालू करण्यासाठी त्यावर क्लिक करा.
हेही वाचा : Google चा मोठा निर्णय! ‘ही’ अकाउंट्स होणार डिलीट, जाणून घ्या यात तुमचा समावेश नाही ना?
रिअलमीच्या फोनमध्ये अॅप्स कसे लपवायचे?
१. सर्वात प्रथम रिअलमीच्या वापरकर्त्यांनी सेटिंग्ज ओपन करावे. त्यानंतर त्यातील सिक्युरिटी पर्यायामध्ये जावे.
२. त्यानंतर तुम्ही App Lock सर्च करा. अॅप लॉकसाठी पासकोड तयार करण्यासाठी सांगितले जाईल.
३. पासकोड टाकून झाल्यानंतर तुम्ही सिक्युरिटी आणि App एन्क्रिप्शनवर जाऊ शकता.
४. त्यानंतर तिथे गेल्यावर पासकोड टाका आणि तुम्हाला जी अॅप लपवायची आहेत ती निवडावी. त्यानंतर हाईड होम स्क्रीन हा पर्याय सुरू करा.
शाओमीच्या फोनमध्ये अॅप्स कसे लपवायचे?
शाओमी आपल्या MIUI ऑपरेटिंग सिस्टममध्ये अॅप्स लपवण्याचा पर्याय देखील देते. हाईड फिचर अॅप Redmi, Xiaomi आणि POCO स्मार्टफोनमध्ये उपलब्ध आहे.
१. सर्वात प्रथम सेटिंगमध्ये जाऊन अॅप ओपन करा.
२. अॅप सेटिंग्जमध्ये तुम्हाला अॅप लॉक फीचर मिळेल. त्यावर क्लिक करा. ते पहिल्यांदा तुम्हाला सर्व्हिस सेट करण्यासाठी सांगेल. त्यासाठी तुम्हाला पासकोड सेट करणे आवश्यक आहे.
३. एकदा वरील प्रोसेस पूर्ण झाली की तुमच्याकडे दोन सेक्शन असतील. अॅप लॉक आणि हिडन अॅप्स. हिडन अॅप्स क्लिक कल्यावर तुम्हाला तुमच्या रेडमी फोनवर इन्स्टाॅल केलेल्या अॅप्सची एक लिस्ट दिसेल.
४. तुम्हाला जे अॅप लपवायचे आहेत ते सर्च करावे. त्यानंतर फक्त स्विचवर टॉगल करा. यामुळे तुमचे अॅप्स लपवले जातील.