स्मार्टफोन निर्माता Xiaomi चा स्वस्त स्मार्टफोन Redmi 10 सेल सुरु झाला आहे. हा फोन फ्लिपकार्ट, mi.com आणि रिटेल स्टोअर्सवरून खरेदी करता येईल. फोनमध्ये 50MP कॅमेरा तसेच वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले आहे. तसंच, या फोनमध्ये तुम्हाला गोरिला ग्लास ३ स्क्रीन प्रोटेक्टर देण्यात आला आहे. याशिवाय हा फोन 6,000mAh बॅटरीसह 18W चार्जिंग सपोर्ट देखील देतो. फ्लिपकार्टवरून खरेदी केल्यावर फोनवर काही आकर्षक ऑफर्सही दिल्या जात आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Redmi 10 तीन वेगवेगळ्या रंगांच्या पर्यायांमध्ये देण्यात आला आहे. ज्यामध्ये कॅरिबियन ग्रीन, मिडनाईट ब्लॅक आणि पॅसिफिक ब्लू यांचा समावेश आहे. Redmi ने हा फोन Realme Norzo फोनला टक्कर देण्यासाठी ऑफर केला आहे.

किंमत आणि उपलब्धता
या फोनची किंमत लॉन्च झाल्यानंतरच समोर आली आहे. त्याच्या बेसिक व्हेरिएंट 4GB RAM + 64GB स्टोरेज पर्यायाची सुरुवातीची किंमत 10,000 रुपयांपासून सुरू होईल. त्याच वेळी, 6GB + 128GB व्हेरिएंटसाठी या फोनची किंमत 12,999 रुपये आहे. तुम्ही ते Flipkart, Mi.com, Mi Home आणि रिटेलर स्टोअरमधून खरेदी करू शकता.

ऑफर
Flipkart द्वारे Redmi 10 स्मार्टफोनवर ऑफर केल्या जात असलेल्या ऑफरबद्दल बोलायचे झाल्यास, HDFC क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास 1000 रुपयांची त्वरित सूट आहे. तसेच, तुम्ही ICICI बँकेच्या क्रेडिट-डेबिट कार्ड किंवा क्रेडिट EMI वरून पेमेंट केल्यास, 1000 रुपयांपर्यंत सूटही दिली जात आहे. दुसरीकडे, तुम्हाला Axis Bank वर 5% पर्यंत सूट मिळत आहे. याशिवाय एक्सचेंज ऑफरवर 11,550 रुपयांपर्यंत सूट आहे. डिलिव्हरी चार्ज फ्री असून दोन दिवसात डिलिव्हरी होईल असे सांगितले जात आहे.

आणखी वाचा : WhatsApp ने आणलंय मल्टी-डिव्हाईस फीचर, आता ५ डिव्हाईसमध्ये अकाउंट चालवता येतील

स्‍पेसिफिकेशन
ड्युअल-सिम (नॅनो) रेडमी 10 वर MIUI 13 सह Android 11 द्वारे समर्थित आहे. या फोनला 20.6:9 रेशो असलेला 6.7-इंचाचा HD+ डिस्प्ले दिला जात आहे. Redmi 10 कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 लेयरने संरक्षित आहे. Redmi 10 ऑक्टा कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 680 SoC द्वारे समर्थित आहे. रॅम 2GB पर्यंत वाढवता येते. Redmi 10 6,000mAh बॅटरीसह 18W चार्जिंग सपोर्ट देखील दिला जात आहे. हे 10W आणि त्याहून अधिक क्षमतेच्या चार्जरने चार्ज केले जाऊ शकते.

फिचर्स
Redmi 10 च्या फिचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, 4G LTE, Wi-Fi 802.11ac, ब्लूटूथ, GPS, USB टाइप-C आणि 3.5mm हेडफोन जॅकमध्ये कनेक्टिव्हिटी दिली जात आहे. याशिवाय, बोर्डवर एक्सीलरोमीटर, अॅम्बियंट लाइट आणि प्रॉक्सिमिटी सेन्सर सारखे सेन्सर दिलेले आहेत. ऑथेंटिकेशनसाठी मागील बाजूस फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Redmi 10 price under 11000 first sale start with 6000mah battery nd 50mp camera know discount offers prp
First published on: 24-03-2022 at 23:47 IST