Twitter हे एक मायक्रोब्लॉगिंग सोशल साईट आहे. एलॉन मस्क या मल्टीनॅशनल कंपनीचे सीईओ आहेत. मागच्या वर्षी त्यांनी ट्विटरचे शेअर्स विकत घेतले होते. पुढे त्यांना ट्विटरचे मालकी हक्क मिळाले. या घटनेपासून एलॉन मस्क आणि ट्विटर याच्याबाबत खूप चर्चा होत आहेत. सीईओपदाचा कारभार सांभाळायला सुरुवात केल्यानंतर मस्क यांनी ट्विटर संबंधित अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. ट्विटरमध्ये ब्लू टिक ही सुविधा आधीपासून उपलब्ध होती. एलॉन मस्क यांनी ट्विटर ब्लूसाठी सब्सक्रिप्शन हा पर्याय सुरु करुन या सेवेसाठी पैसे आकारायला सुरुवात केली. सब्सक्रिप्शन न घेतलेल्या यूजर्सच्या अकाउंटवरील ब्लू टिक नाहीशी झाली.

एलॉन मस्क यांनी घेतलेल्या निर्णयाला ट्विटर यूजर्सनी सुरुवातीच्या काळात समिश्र प्रतिसाद दिला. बऱ्याच जणांनी ट्विटर ब्लू सब्सक्रिप्शन घेतले. आता ट्विटर ब्लूच्या सबस्क्रायबर्समध्ये मोठ्या प्रमाणात घट होत असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे मस्क यांचा ट्विटर ब्लू टिकविषयीची निर्णय चुकला आहे असे म्हटले आहे.

The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
India Wholesale Inflation Reaches 3 Month High
घाऊक महागाई दर मार्चमध्ये किंचित वाढून तिमाही उच्चांकावर
Israel use of AI in war revealed in reports by Israeli and Palestinian journalists
इस्रायलकडून युद्धात ‘एआय’चा वापर? इस्रायली आणि पॅलेस्टिनी पत्रकारांच्या अहवालात खुलासा
MP Supriya Sule criticized the leaders who left NCP
“रिश्ता तोडना आसान है, निभाना मुश्किल है…” राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांवर खासदार सुप्रिया सुळेंची घणाघाती टीका

दैनिक जागरणने दिलेल्या माहितीनुसार, ट्विटर ब्लू सब्सक्रिप्शनसाठी यूजर्सनी सुरुवातीच्या काही महिन्यांसाठी दर महिन्याला ८ डॉलर या हिशोबाने पैसे भरले होते. सब्सक्रिप्शन संपल्यानंतर या यूजर्सनी पुन्हा पैसे भरणे टाळले आहे, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुमारे १,५०,००० यूजर्सपैकी ६८,१५७ यूजर्सनी ३० एप्रिलपर्यंतचे ट्विटर ब्लू सब्सक्रिप्शन घेतले होते. या सबस्क्रायबर्सपैकी अनेकांकडे ब्लू टिक नसल्याची माहिती एका अहवालातून मिळाली आहे.

आणखी वाचा – WhatsApp Web चा वापर करताय? ‘हा’ खास पर्याय मिळाल्याने आता आधीच कळणार सर्वकाही…

गेल्या वर्षीच्या अहवालानुसार, एकूण १,५०,००० यूजर्सनी ट्विटर ब्लू सब्सक्रिप्शन साइन अप केले होते. यातील ८१,८४३ यूजर्सनी ही सेवा रद्द केली आहे. म्हणजे ५४.५ टक्के यूजर्सनी सबस्किप्शन कॅन्सल केले आहे. सध्या ट्विटर ब्लू सबस्क्रायबर्सची संख्या ४,४४,४३५ इतकी आहे. भारतामध्ये ट्विटर ब्लू सब्सक्रिप्शनची प्रति महिना किंमत ९०० रुपये इतकी आहे. मागच्या महिन्यात ही ट्विटर ब्लू सब्सक्रिप्शन लॉन्च करण्यात आले. यामुळे पैसे न भरलेल्या लोकांच्या अकाउंटवरील ब्लू टिक हटवण्यात आली होती. तसेच सब्सक्रिप्शन घेऊनही काही काळासाठी अनेक व्हेरिफाइड अकाउंट्सवरील ब्लू टिक गायब होती.