रशियाने युक्रेनमध्ये आपले हल्ले आणखी तीव्र केले आहेत. रशियाने युक्रेनवर लादलेल्या युद्धामध्ये युक्रेनचं नेतृत्व त्यांचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की करत आहेत. देश सोडून पळून जाण्याची अमेरिकेचे ऑफर धुडकावून झेलेन्स्की यांनी आपण देशामध्येच राहणार असून रशियाविरोधात लढणार असल्याचं म्हटलंय. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष सध्या जगभरातील नेत्यांना फोन करुन समर्थनाची मागणी करताना दिसत आहेत. तर
युक्रेनचे उपपंतप्रधान आणि युक्रेनचे डिजिटल परिवर्तन मंत्री मायखाइलो फेडोरोव्ह यांनी अ‍ॅपलचे सीईओ टिम कुक यांना एक खुले पत्र लिहिले आहे. फेडोरोव्हने हे पत्रही @FedorovMykhailo या त्याच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे. पत्रात कुक यांच्याकडे रशियामध्ये आयफोनची विक्री थांबवण्याची विनंती करण्यात आली आहे. यामुळे अमेरिकेकडून रशियावर घातलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईल बळ मिळेल, असं सांगण्यात आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“रशियन फेडरेशनच्या नागरिकांसाठी अ‍ॅपल स्टोअर बंद करण्यासाठी आणि अमेरिकन सरकारच्या निर्बंधांचं समर्थन करण्यासाठी मी अ‍ॅपलचे सीईओ टिम कुक यांच्याशी संपर्क साधला आहे. जर तुम्ही रशियाचे अध्यक्ष मारेकरी असल्याचे मान्य केले, तर तुम्हाला ही विनंती मान्य करावी लागेल. त्यामुळे त्यांना रशिया २४ या एकमेव उपलब्ध साइटसह राहावं लागेल,” असं फेडोरोव्हने शेअर केलेल्या पत्रात म्हटलं आहे.

प्रिय टिम,
रशियन फेडरेशनने माझ्या देशावर लष्करी हल्ला केला आहे! फक्त कल्पना करा, २०२२ मध्ये, क्रूझ क्षेपणास्त्रे युरोपच्या मध्यभागी निवासी परिसर, बालवाडी आणि रुग्णालयांवर हल्ला करतात. सशस्त्र सेना आणि नागरिक शेवटपर्यंत युक्रेनचे रक्षण करत आहेत! संपूर्ण जग निर्बंध लादून आक्रमकांना मागे हटवत आहे. यामुळे शत्रूला लक्षणीय नुकसान सहन करावे लागेल. पण आम्हाला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे – २०२२ मध्ये, मॉडेम तंत्रज्ञान कदाचित रणगाडे, रॉकेट लाँचर्स आणि क्षेपणास्त्रांसाठी सर्वोत्तम उत्तर आहे.
मी तुम्हाला आवाहन करतो आणि मला खात्री आहे की, युक्रेन, युरोप आणि शेवटी संपूर्ण लोकशाही जगाला रक्तरंजित हुकूमशाही आक्रमणापासून वाचवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न कराल. रशियन फेडरेशनला अ‍ॅपल सेवा आणि उत्पादनांचा पुरवठा थांबवाल! आम्हाला खात्री आहे की, यामुळे तरुण आणि रशियातील नागरिक लष्करी आक्रमणास सक्रियपणे थांबवण्यास प्रेरित करतील.

तुमचे विनम्र,
युक्रेनचे उपपंतप्रधान
मंत्री मायखाइलो फेदोरोव

रशियाची आर्थिक नाकेबंदी ; ‘स्विफ्ट’ प्रणालीतून बँका हद्दपार, अमेरिकेसह मित्रराष्ट्रांचा महत्त्वाचा निर्णय

अ‍ॅपल ही रशियाला स्मार्टफोन पुरवठा करणारी सर्वात मोठी स्मार्टफोन कंपनी आहे. स्टॅटकाउंटरच्या अहवालानुसार, रशियामध्ये अ‍ॅपल आयफोनचा बाजार हिस्सा २८.७२ टक्के आहे. त्यानंतर २३.३ टक्क्यांसह Xiaomi चा क्रमांक लागतो. तर सॅमसंग २२.४ टक्क्यांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. मग Huawei आणि Realme चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ukraine vice prime minister mykhailo fedorov wrote an open letter to apple ceo rmt
First published on: 28-02-2022 at 09:25 IST