Vodafone Idea 5G लाँच: ५जी इंटरनेटच्या प्रतीक्षेत असलेल्या ग्राहकांना लवकरच चांगली बातमी मिळणार आहे. ५ जी स्पेक्ट्रमचा लिलाव झाल्यापासून, Jio, Airtel आणि Vodafone Idea चे वापरकर्ते 5G सेवा अधिकृतपणे कधी सुरू होईल याची वाट पाहत आहेत. मात्र, अद्याप कोणत्याही कंपनीने 5G लाँचची तारीख जाहीर केलेली नाही. दरम्यान, Vodafone Idea ने आपल्या विद्यमान ग्राहकांना 5G लाँच सुरू करण्याबाबत माहिती देण्यास सुरुवात केली आहे. आत्तापर्यंत रिलायन्स जिओ आणि एअरटेल कडून 5G लाँच संदर्भात ग्राहकांना कोणताही संदेश प्राप्त झालेला नाही. मात्र, 5G लाँचबद्दल कंपनीकडून Vi ग्राहकांना एसएमएस मिळत आहेत. जाणून घ्या या मेसेजबद्दल..

Vodafone Idea लवकरच 5G लाँच करणार आहे

Vodafone Idea चा मेसेज असा आहे, “गुड न्यूज!! Wi नेटवर्क ५जी वर अपग्रेड केले जात आहे! तुमचा नेटवर्क अनुभव आता चांगला होईल, लवकरच तुम्हाला आमच्या Vi नेटवर्कसह दिल्ली-एनसीआरमध्ये चांगले कव्हरेज आणि सुपरफास्ट इंटरनेट सेवा अनुभवता येईल.”

हा संदेशाची माहिती 91mobiles च्या टीमकडून मिळाली आहे. मात्र, कंपनीने पाठवलेल्या मेसेजमध्ये लॉन्चची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. पण, असे मानले जात आहे की व्होडाफोन आयडियाचा ५जी लवकरात लवकर येणार आहे.

( हे ही वाचा: 13,999 रुपयांमध्ये खरेदी करा Apple iPhone SE; Flipkart ने दिलीय आकर्षक सूट)

5G लाँच तारीख

Vii ने नोकिया आणि एरिक्सन सोबत भागीदारी केली आहे आणि भारतातील ट्रायल स्पेक्ट्रम वापरून ५जी नेटवर्कची चाचणी घेतली आहे. त्याच वेळी, काही जुन्या अहवालांनुसार, २९ सप्टेंबर २०२२ रोजी ५जी सेवा सुरू होईल. इंडिया मोबाईल काँग्रेस २०२२ चे उद्घाटन २९ सप्टेंबर रोजी होत आहे आणि या प्रसंगी ५जी सेवा देखील भारतात जारी केली जाईल. वर्षाच्या अखेरीस अनेक शहरांमध्ये व्हीआय ५जी लाइव्ह केले जाईल अशी अपेक्षा आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

Vi 5G प्लॅन महाग होईल

काही वेळापूर्वी, VIL चे व्यवस्थापकीय संचालक आणि CEO रविंदर टक्कर यांनी गुंतवणूकदारांशी केलेल्या एका कॉलमध्ये सांगितले की कंपनीने नुकत्याच झालेल्या ५जी स्पेक्ट्रम लिलावासाठी मोठी गुंतवणूक केली आहे. त्यामुळे ५जी सेवांच्या डेटा प्लॅनसाठी जास्त शुल्क आकारण्यात येतील अशी चर्चा सुरू आहे. या वर्षाच्या अखेरीस सर्व प्रकारच्या दूरसंचार सेवांचे शुल्क वाढवले ​​जाईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.