विवो कंपनीने अलीकडेच चीनमध्ये X90 सिरीज लाँच केली आहे. नवीन फ्लॅगशिपच्या सिरीजमध्ये तीन स्मार्टफोन्सचा समावेश आहे. Vivo X90, Vivo X90 Pro आणि Vivo X90 Pro Plus असे हे तीन स्मार्टफोन्स आहेत. अलीकडे लिकने विवो एक्स ९० सिरीजच्या स्मार्टफोन्सचे फीचर्स आणि किंमतीवरही प्रकाश टाकला आहे. टिपस्टरनुसार, विवो एक्स ९० आणि विवो एक्स प्रो च्या सिरीज स्नॅपड्रॅगन ८ च्या जनरेशन ऐवजी मीडिया टेक डिमेन्सिटी ९२०० चिपसेटने(MediaTek Dimensity 9200 chipset) समर्थित केल्या जाणार आहेत. ही कंपनी विवो एक्स प्रो प्लस लाँच करणार नाही.
विवो एक्स ९० आणि विवो एक्स ९० प्रो या दोन्ही स्मार्टफोन्सचा डिस्प्ले ६.७८ इंचाचा आहे. तसेच तो फुल एचडी एमओएलईडी डिस्प्ले आहे. या स्मार्टफोनमध्ये १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटर्नल स्टोरेज असणार आहे. विवो एक्स ९० या फोनमध्ये १२ मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड लेन्स आणि १२ मेगापिक्सलचा पोर्ट्रेट सेन्सर असणार आहे. तसेच ५० मेगापिक्सलचा प्राथमिक सेन्सरचा समावेश असणार आहे. विवो एक्स ९० आणि एक्स ९० प्रो या स्मार्टफोन्समध्ये ३१ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा येतो.
मलेशियामध्ये विवो एक्स ९० आणि एक्स ९० प्रो २ फेब्रुवारीपासून विक्री सुरु होणार आहे. यांची किंमत अंदाजे अनुक्रमे ६९,२२१(आरएम ३,६९९) आणि ९९,१६२(आरएम ५.२९९) अशी असण्याची शक्यता आहे. विवोने एक्स ९० ही सिरीज भारतीय बाजारपेठेत कधी येईल याची अद्याप पुष्टी केलेली नाही आहे. मागील वर्षी एक्स ८० आणि एक्स ८० प्रो भारतात मे महिन्यात लाँच झाले होते. ज्याची किंमत अनुक्रमे ५४,९९९ आणि ७९,९९९ रुपये होती.