स्मार्टफोन निर्माता कंपनी Vivo ने त्यांचा नवीन ५G स्मार्टफोन Vivo Y75 5G भारतात लॉंच केला आहे. हा सुंदर स्मार्टफोन जबरदस्त वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. कॅमेर्यापासून ते बॅटरीपर्यंत तुम्हाला यात सर्व काही आश्चर्यकारक आढळेल. चला जाणून घेऊया या फोनची वैशिष्ट्ये आणि त्याची किंमत.
Vivo ने नवीन ५G स्मार्टफोन केला लॉंच
Vivo चा नवीन स्मार्टफोन, Vivo Y75 5G 27 जानेवारी रोजी लॉंच करण्यात आला आहे. विवोचा हा स्मार्टफोन आता Vivo च्या ई-स्टोअर आणि भागीदार रिटेल स्टोअरमध्ये देखील उपलब्ध करण्यात आला आहे. २६,९९९ रुपयांच्या किमतीत लॉंच केलेला हा स्मार्टफोन सध्या विवोच्या ई-स्टोअरवर विशेष सवलतीनंतर २१,९९९ रुपयांना विकला जात आहे. चला त्याच्या वैशिष्ट्यांवर एक नजर टाकूया.
Vivo Y75 5G डिस्प्ले आणि स्टोरेज
ऑक्टा कोअर मीडियाटेक Dimensity ७०० SoC चिपसेटवर काम करणारा विवो स्मार्टफोन हा ६.५८-इंचाच्या फुल HD + LCD डिस्प्लेसह येतो. त्याच्या डिस्प्लेमध्ये तुम्हाला २,४०८ x १,०८० पिक्सेलचे रिझोल्यूशन मिळेल. स्टोरेज बद्दल बोलायचे झाले तर Vivo Y75 5G मार्केट मध्ये फक्त ८ जिबी रॅम आणि १२८ जिबी रॅमच्या स्टोरेज प्रकारात उपलब्ध आहे.
अँड्रॉइड १२ वर आधारित फनटच ओएस १२ वर चालणाऱ्या या फोनचे स्टोरेज मायक्रो SD कार्डच्या मदतीने १TB पर्यंत वाढवता येते, तसेच याची रॅम ८जिबी वरून १२जिबी पर्यंत घेता येते.
विवोच्या या स्मार्टफोनचा कॅमेरा
विवोचा हा स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येतो. प्राथमिक कॅमेरा f/१.८ अपर्चरसह ५०MP, f/२.० अपर्चरसह २MP मॅक्रो कॅमेरा आणि २MP बोकेह कॅमेरा आहे. या स्मार्टफोनचा कॅमेरा सेटअप विवोच्या Xtreme Night AI-आधारित अल्गोरिदमला सपोर्ट करतो, ज्याच्या मदतीने वापरकर्ते कमी प्रकाशातही चांगले फोटो काढू शकतील. फ्रंट कॅमेर्याबद्दल बोलायचे झाल्यास, Vivo Y75 ५जी f/२.० अपर्चरसह १६MP फ्रंट कॅमेरासह येतो.
बॅटरी आणि इतर वैशिष्ट्ये
Vivo Y75 ५G हा स्मार्टफोन ५,०००mAh बॅटरीसह येतो आणि USB टाइप-सी चार्जिंगद्वारे १८W जलद चार्जिंगला सपोर्ट करतो. इतर वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर विवोचा हा नवीनतम ५जी स्मार्टफोन ब्लूटूथ ५.१, वायफाय, GPS आणि FM रेडिओ सपोर्ट सारख्या अनेक वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. ड्युअल सिम सुविधेसह या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला प्रॉक्सिमिटी सेन्सर, जायरोस्कोप आणि ई-कंपास सारखी सर्व वैशिष्ट्ये देखील मिळतील.
सध्या Vivo Y75 5G कंपनीच्या अधिकृत ई-स्टोअरवर सवलतीत उपलब्ध आहे आणि त्यामुळे तुम्ही हा फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही संधी गमावू नका.