scorecardresearch

WhatsApp नवं फिचर आणण्याच्या तयारीत; आसपासच्या रेस्टॉरंट-स्टोअर्सबद्दल माहिती कळणार

व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून युजर्संना नवनव्या फिचर्ससोबत सुविधा मिळत आहेत.

WhatsApp-New-Feature
WhatsApp नवं फिचर आणण्याच्या तयारीत; आसपासच्या रेस्टॉरंट-स्टोअर्सबद्दल माहिती कळणार (Photo-AP)

व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून युजर्संना नवनव्या फिचर्ससोबत सुविधा मिळत आहेत. जे लोक त्यांच्या दररोजच्या चॅटिंगसाठी WhatsApp वापरतात त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता सोशल मीडिया अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या यूजर्ससाठी एक नवीन फीचर आणण्याच्या तयारीत आहेत. युजर्संना त्यांच्या जवळील व्यवसाय सहजपणे शोधण्यात मदत होणार आहे. मेसेजिंग प्लॅटफॉर्मच्या फिचर्सचा मागोवा घेणाऱ्या WABetaInfo या प्लॅटफॉर्मच्या अहवालात म्हटले आहे की, व्हॉट्सअ‍ॅपमध्ये “Businesses Nearby” नावाचा नवीन सेक्शन मिळू शकते. युजर्स या सेक्शनमध्ये रेस्टॉरंट्स, स्टोअर्स, किराणा दुकाने आणि इतर ठिकाणे पाहू शकतील. मात्र व्हॉट्सअ‍ॅपवरून थेट ऑर्डर करू शकतील का? याबाबत स्पष्टता नाही. सध्यातरी संपर्क, स्थान अशी माहिती पाहू शकतील. हे फीचर अँड्रॉइडसाठी व्हॉट्सअ‍ॅप बीटामध्ये दिसले आहे, लवकरच आयफोनमध्येही येण्याची शक्यता आहे. या फिचरवर सध्या काम सुरू आहे. रोलआउटसाठी कोणतीही निश्चित तारीख जाहीर केलेली नाही.

दरम्यान, व्हॉटअ‍ॅपने बिझनेस अकाऊंटना मॅसेजला झटपट उत्तर देण्यासाठी एक नवीन शॉर्टकट दिला आहे. iOS आणि Android दोन्ही बीटा वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपने चॅट शेअर अ‍ॅक्शन मेनूमध्ये नवीन शॉर्टकट दिला आहे. नवीन पर्याय कॅमेरा, फोटो आणि व्हिडिओ लायब्ररी, कॅटलॉग आणि इतर पर्यायांसह पाहता येईल. हे व्हॉट्सअ‍ॅप बिझनेस बीटा वापरकर्त्यांना आयफोनसाठी ‘+’ चिन्हावर आणि अँड्रॉइडसाठी अटॅचमेंट टॅप केल्यावर मॅसेजला तात्काळ उत्तर देण्यास अनुमती देईल. व्हॉट्सअॅप बिझनेस अकाउंटसाठी क्विक रिप्लाय फीचर आधीच उपलब्ध आहे. कीबोर्डवर ‘/’ दाबून ते सक्रिय केले जाऊ शकते. त्यानंतर ते ग्राहकाला पाठवण्यासाठी सूचीमधून संदेश निवडू शकतात.

Jio, Vi, Airtel आणि BSNL नेटवर्कचा आवडीचा फोन नंबर हवा आहे? घरबसल्या असा मिळवा

WhatsApp ने अलीकडेच आपल्या युजर्सच्या सुरक्षेसाठी एक नवीन फीचर आणले आहे. या अंतर्गत अज्ञात युजर्संना तुमचे शेवटचे पाहिलेले आणि ऑनलाइन स्टेटस (जर तुम्ही त्यांच्याशी कधीही चॅट केलेले नसेल) पाहण्यापासून रोखण्याची सुविधा दिली आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-12-2021 at 10:56 IST

संबंधित बातम्या