सदस्यत्वावर आधारीत व्हिडिओ मनोरंजन सेवा मोबाइलवर पुरवणाऱ्या ‘नेक्सजीटीव्ही’ने आता भक्तीपर सामग्री पुरवण्यासाठी ‘आय-फेथ’ नावाचे नवीन अॅप सुरू केले आहे. ‘आय-फेथ’वर लाइव्ह भक्तीपर सामग्री, भजन आणि जन्म कुंडलीसाठी ऑन डिमांड व्हिडीओ यांसह ज्ञान मंत्र, दिव्य ज्ञान, पूजा विधी, श्लोक, राशीभविष्य, भक्तीपर सिनेमा, भगवंतांची आरती यापैकी कोणत्याही आध्यात्मिक गरजेचा आस्वाद घ्यायचा झाल्यास तो केवळ एका क्लिकद्वारे घेता येईल.
भारतात भक्तीपर सामग्रीमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्याचे आय-फेथचे उद्दिष्ट असून दर्शकांना अखंडपणे व्हिडीओचा आस्वाद घेता यावा याकरिता नेक्सजीटीव्हीने हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. दर्शन२४, दिशा टीव्ही, पॉवरव्हिजन, दिव्य आणि ईश्व्र टीव्ही यांसारख्या प्रसिद्ध भक्ती चॅनेलकडून लाईव्ह स्ट्रीमिंग आणि ऑन-डिमांड व्हिडीओ नेक्सजीटीव्हीच्या ग्राहकांसाठी कॅटलॉगचा भाग म्हणून उपलब्ध होतील.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 6, 2016 1:01 am