News Flash

१० हजार विद्यार्थ्यांनी घातले १ लाख ३१ हजार ५७३ सूर्यनमस्कार

आज राष्ट्रीय सूर्यनमस्कार दिन

सूर्यनमस्कार

कल्याणमध्ये १० हजार १२१ विद्यार्थ्यांनी १ लाख ३१ हजार ५७३ सुर्यनमस्कार घालण्याचा पराक्रम केला आहे. महापालिका आणि शहरातील विविध संस्थांनी एकत्र येऊन राष्ट्रीय सूर्यनमस्कार दिनानिमित्त या उपक्रमाचे आयोजन केले होते. शहरामधील सुभेदारवाडा कट्टा, महिला बालकल्याण समिती, माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघटना व क्रीडाभारती यांच्यातर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले.

कल्याण पश्चिम येथील अत्रे रंगमंदिराजवळील सुभाष मैदानामध्ये सकाळच्या सुमारास १० हजार १२१ विद्यार्थ्यांनी १ लाख ३१ हजार ५७३ सुर्यनमस्कार घातले.

यावेळी कल्याण पश्चिमचे आमदार नरेंद्र पवार, कल्याण-डोंबिवलीच्या महापौर विनीता राणे, उपमहापौर उपेक्षा भोईर, महिला बालकल्याण समितीच्या सभापती रेखा चौधरी व सर्व सदस्या उपस्थित होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2019 5:36 pm

Web Title: 10 thousand students performed 1 lakh 31 thousand surya namaskar in kalyan
Next Stories
1 भूकंपाच्या धक्क्यांनी पुन्हा हादरले डहाणू, तलासरी
2 भिवंडीत तरुणीवर सामूहिक बलात्कार
3 घोडबंदरमुळे टीएमटीचीही ‘कोंडी’
Just Now!
X