मामाकडे पाहुणी म्हणून आलेल्या अल्पवयीन मुलीला मोटरसायकलवर जबरदस्तीने बसवून निर्जनस्थळी नेत तिच्यावर बलात्कार केल्याची संतापजनक घटना शहापूर तालुक्यात घडली. सावरदेव पाडयाजवळील जंगलात ही घटना घडली असून याप्रकरणी शहापूर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

शहापूरमधील १६ वर्षीय मुलगी नांदगावजवळील जमनाचा पाडा येथे मामाकडे आली होती. चार दिवसांपूर्वी पीडित मुलगी रात्री आठच्या सुमारास घरी येत असताना जमनाच्या पाडयाजवळील रस्त्यावर भाऊ रेंजड आणि गणेश जाधव यांनी मोटरसायकलवर तिला जबरदस्तीने बसविले व सावरदेव पाड्याजवळील जंगलात नेले. काही वेळाने रेंजड निघून गेला आणि गणेशने लाकडी तराफ्यावरून पीडित मुलीला तलावाच्या पलीकडे नेले. तिथे त्याने पीडितेवर दोन वेळा बलात्कार केला.2 arrested for rape on 16 year old girl in shahapurया प्रक रणी बुधवारी रात्री शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून रेंजड व गणेश जाधव या दोघांना शहापूर पोलिसांनी अटक केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. जे. चौधरी व पोलीस शिपाई के. बी. गोरले अधिक तपास करत आहे.

Nashik, Girl died falling into bucket,
नाशिक : पाण्याच्या बादलीत पडून बालिकेचा मृत्यू
Loksatta sanvidhanbhan Constitution Struggle for equality
संविधानभान: समतेसाठी संघर्षयात्रा
7 year old boy drowned in swimming pool marathi news
पुणे: जलतरण तलावात बुडून सात वर्षांच्या मुलाचा मृत्यू, वारजे भागातील दुर्घटना
Girl organ donation
शेतमजूर कुटुंबाचा धाडसी निर्णय; मुलीच्या अवयवदानातून…