भिवंडीतील धामणकर नाका येथील मोदी डाइंग कंपनीला भीषण आग लागली आहे. ही घटना आज, शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. यात कोणतीही जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही.

भिवंडीतील औद्योगिक क्षेत्रातील मोदी डाइंग कंपनीला आज दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. यात कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. आगीत जिवीतहानी अथवा कुणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. जवानांकडून आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. तसेच कल्याण, भिवंडीसह ठाण्यातील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आल्याची माहिती मिळते. भिवंडीतील दापोडा येथील हरिहर कम्पाउंडमधील एका प्लॅस्टिकच्या गोदामाला रविवारी सकाळी अचानक आग लागली. या आगीत ४ कामगारांचा मृत्यू झाला तर दोघेजण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये या गोदामात काम करणाऱ्या ३ महिला आणि एक पुरुषाचा समावेश आहे.

दरम्यान, गेल्या महिन्यात दापोडा भागातील हरिहर कम्पाउंड येथे प्लॅस्टिकच्या गोदामाला आग लागली होती. आगीत होरपळून चौघांचा मृत्यू झाला होता. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला होता. आग इतकी भीषण होती की त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी तीन तास लागले होते. आग विझवण्यात यश आल्यानंतर देखील कुलिंग ऑपरेशन राबवण्यात आले होते. तर जखमींना मुंबईतील लोकमान्य टिळक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.