12 July 2020

News Flash

मदरशामध्ये लहान मुलांना अमानुष मारहाण

संतोष भुवन परिसरात एका मदरशामध्ये एका मौलानाने काही विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केली आहे.

नालासोपाऱ्यात शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल

विरार : नालासोपाऱ्यातील संतोष भुवन परिसरात एका मदरशामध्ये एका मौलानाने काही विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केली आहे. विद्यार्थ्यांनी पाठांतर न केल्याने ही मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नालासोपारा पूर्वेच्या संतोष भुवन परिसरात असणाऱ्या जामिया बशरातुल उलूम या मदरशामध्ये १० ते १२ अल्पवयीन मुले शिक्षण घेत आहेत. एका गाळ्यात चालणाऱ्या या मदरशामधील शिक्षक असलेला मौलाना मुलांना मारहाण करत असल्याची माहिती याच मदरशात शिकरणाऱ्या एका मुलाने आपल्या आईला दिली. या मुलाच्या आईने स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांना या संदर्भात माहिती दिली असता या सामाजिक कार्यकर्त्यांनी या मदरशावर पोलिसांच्या मदतीने छापे टाकून सारे प्रकरण उघडकीस आणले.

या मदरशामध्ये १२ ते १५ मुले शिकत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलाना पाठांतर आठवत नसल्या कारणाने मौलाना मोहम्मद जहाँगीर याने मुलांना पट्टय़ाने अमानुष मारहाण केली. त्याशिवाय चमचा गरम करून मुलांच्या शरीरावर चटके दिले. याबाबत कुठे वाच्यता केल्यास अधिक मारहाण करत असे. यामुळे मुले कुणाकडेही या प्रकारची तक्रार करत नसत. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मुलांवर उपचार करण्यात येत आहेत. आरोपी मौलाना फरारी असून पोलीस त्याचा शोध घेत असल्याची माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी नालासोपारा अमोल मांडवे यांनी दिली आहे.

याआधी विरार येथील गडगा पाडा परिसरात एका मदरशामध्ये एका १४ वर्षीय मुलावर उकळते पाणी टाकले होते. मदरसामध्ये परराज्यातून मुले आणून त्यांच्या नावाखाली सामाजिक संघटना, स्थनिक नेते, सेवाभावी संस्था, काही कंपन्यांकडून आर्थिक फायदा करून घेण्याच्या सपाटा लावला असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते राजेश शर्मा यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2019 1:56 am

Web Title: brutally assaulted children by maulana in madrasa in nalasopara zws 70
Next Stories
1 वसईत नाताळ सणाच्या आगमनाची तयारी
2 पुलंच्या अपरिचित साहित्याचा अभिवाचनातून अनोखा ‘शब्दवेध’
3 ठाण्यातील वृक्ष कत्तलप्रकरणी गुन्हा 
Just Now!
X